तरुण भारत

राजौरीत घुसखोरी करणारा पाकिस्तानी दहशतवादी ठार

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या राजैरीमधील भींबर गल्लीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा गुरुवारी रात्री सुरक्षा दलाने खात्मा केला. दहशतवाद्याच्या ताब्यातील शस्त्रास्त्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसून, पाक दहशतवाद्यांच्या घुसखोरीची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलाने या भागात शोधमोहिम सुरू केली आहे.

Advertisements

दरम्यान, गुरुवारी दुपारी गुलपूर सेक्टरमधील चाकण दा बाग परिसरातील नियंत्रण रेषेलगत असलेल्या पाकच्या ताब्यातील भागातून भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या एका किशोरवयीन मुलाला सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून, तो सीमेपलीकडील रावलाकोट जिल्ह्यातील आहे. त्याला गुलपूर येथील मुख्यालयात आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. यावषी या जिह्यातील नियंत्रण रेषेच्या पलीकडून अल्पवयीन मुलांची भारतीय हद्दीत प्रवेश करण्याची ही पाचवी घटना आहे.

Related Stories

‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप उद्या भारतात पोहचणार

Abhijeet Shinde

लोहगाव विमानतळ 15 दिवस बंद

datta jadhav

अमेरिकेच्या चार खासदारांना चीनमध्ये बंदी

datta jadhav

जळगाव वसतिगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

Rohan_P

आता स्वतःच करा कोरोनाची चाचणी

Amit Kulkarni

तणाव कमी करण्यावर भारत-चीन एकमत

Patil_p
error: Content is protected !!