तरुण भारत

दापोली एसटी संपामध्ये फुट; आगारातून सात गाड्या रवाना

दापोली / प्रतिनिधी

शासनाने दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगत दापोली आगारातील 14 एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून दापोली आगारांमध्ये आपली सेवा बजावली. यामुळे दापोली आगारातून सात गाड्या दापोली तालुक्यात रवाना झाल्या. यामुळे दापोली बस आगारातील एसटी संपात फूट पडल्याचे दिसून येत आहे

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगार वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचप्रमाणे 24 तासांची मुदत देऊन शुक्रवार सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेवर रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दापोली आगारातील 14 एसटी चालक, वाहक यांनी शुक्रवारपासून आपल्याला पगारवाढ मान्य नसल्याचे सांगत आपली सेवा पूर्ववत सुरू केली. यामुळे यातील निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील रद्द करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दापोली आगारातून दाभोळ, उसगाव, हर्णे, बुरोंडी, मुरुड, कादिवली व वाकवली मार्गे गावतळे आदी बस गाड्या प्रवाशांच्या सेवेत रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. यामुळे प्रवाशांमध्ये व विद्यार्थी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Advertisements

Related Stories

सुरळमध्ये विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान

Patil_p

उगाडे रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित

NIKHIL_N

फणसवणे वनेवाडी येथील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

अमेरिकेत राखी पाठवण्यासाठी लागणार १५५० रुपये

Patil_p

शहर विकासासाठी आठ दिवसांत 5 कोटींचा निधी

Patil_p

रत्नागिरी :भाट्ये किनाऱ्यावर समुद्राच्या उधाणाने मोठे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!