तरुण भारत

नांद्रेतील शेतकरी आक्रमक, रेल्वे दुहेरीकरणाचे काम पाडले बंद

नांद्रे/प्रतिनिधी

नांद्रे खोतवाडी एल. सी. ग्रेट नं. 121( 259633) या गेट खालील मोहरीतून पावसाचे पाणी व पूर्वेकडील शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग करून द्यावा. तसेच एल.सी.गेट नं.121 ते एल.सी.गेट नं.122 पर्यतचा रेल्वे लाईन लगत कॉंक्रेटीकरणचा मजबूत रस्ता करून द्यावा या प्रमुख दोन प्रलंबित मागण्यांकरिता आज येथील संतप्त शेतकऱ्यांनी रेल्वे दुहेरीकरणाचे काम बंद पाडत अंदोलन केले.

ऊस वाहतूकीस रस्ता नाही, शेतीला पाणी पुरवठा नाही, शेतीतील साचलेल्या पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन महावीर भोरे, विकास पाणी पुरवठ्याचे संचालक मधुकर यादव पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अंदोलन करतरेल्वे दुहेरीकरणाचे काम बंद पाडले. यांची दखल घेत रेल्वे प्रशासनच्या वतीने दिपक आरया मिरज यांनी शेतकऱ्यांची भेट घेत अडचणी समझून घेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत दोन दिवसात तुमचे प्रश्न सोडण्याची हमी दिल्याने तात्पुरते हे अंदोलन स्थगित करण्यात आले. जर येत्याकाही दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र अंदोलन छेडण्यात येणार आहे आसे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

निर्बंधातून शिथिलता मिळणार काय?

Abhijeet Shinde

सांगली : महापुराने झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टरचे पंचनामे पुर्ण

Abhijeet Shinde

बेळंकीत पॉझिटिव्ह महिलेनेच वाढली पंगत, जेवलेल्यांचा शोध सुरू

Abhijeet Shinde

गोसावी बरोबरच्या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

Abhijeet Shinde

जतचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

Abhijeet Shinde

सांगली एसटी विभागातील ८८ बसेस इतर डेपोत रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!