तरुण भारत

जालगावामध्ये विहिरीत पडलेल्या डुक्कराच्या चार पिल्लांना जीवदान; मादीचा मृत्यू

मौजे दापोली/प्रतिनिधी

दापोली शहरालगत असलेल्या जालगाव ब्राह्मणवाडी येथील एका विहिरीत पडून डुक्कराच्या मादीचा मृत्यू झाला असून चार पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांना यश आले.

जालगाव ब्राह्मणवाडी येथील प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या विहिरीत पाच रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाचे वनअधिकारी वैभव बोराटे व वनपाल एस. एस. सावंत हे आपल्या वनरक्षक जी. एम. जळणे, शुभांगी गुरव यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने चार पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र यात मादीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना बाहेर काढण्यासाठी वनविभाग अधिकाऱ्यांना जालगाव गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. मृत झालेल्या डुक्कर मादीचे वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर जमिनीमध्ये पुरून विल्हेवाट लावण्यात आली.

Advertisements

Related Stories

कोकणातील माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार

Patil_p

रत्नागिरीतील कोरोना स्थितीची केंद्राकडून गंभीर दखल

Patil_p

जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाला पूर्वीप्रमाणे सूचना

Patil_p

तीन जीवांच्या पुनर्भेटीसाठी चिपळूणकरांचे ‘ऑपरेशन ममता’!

Patil_p

चिपळूण गुटखा प्रकरणाचे सावंतवाडी कनेक्शन!

Patil_p

कोंबडी 50, शेळी 3 हजार तर घराला 5 हजार

Patil_p
error: Content is protected !!