तरुण भारत

‘गती शक्ती योजने’अंतर्गत लॉजिस्टिक क्षेत्राला मजबुती

मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्सची माहिती -देशातील 101 प्रकल्पांची निवड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत 101 प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. बंदरांशी संपर्काचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी या प्रकल्पांचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होणार आहे. वापर आणि उत्पादन केंद्राशी संपर्कासाठी ही बंदरे भविष्यात खूप मदतीची ठरणार आहेत. यासंदर्भातली योजना आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी इंडस्ट्री बॉडी सीआयआयच्या कार्यक्रमप्रसंगी दिली आहे.

सोनोवाल यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार देशातील 24 राज्यांमध्ये 111 वॉटरवेजला नॅशनल वॉटरवेज म्हणून घोषित केले आहे. यासह भारतासाठी लॉजिस्टिक्स शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही देशातील लॉजिस्टिक इकोसिस्टमला मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गती शक्तीच्या सादरीकरणावेळी सांगितले आहे, की हा असा प्लॅटफॉर्म असणार आहे, की जो सरकारच्या 16 मंत्रालयांशी जोडला जाणार आहे. जवळपास 100 लाख कोटी रुपयांच्या योजनांचे मॉनिटरिंग करण्यास मदत होणार असल्याचा दावाही सरकारने यावेळी केला आहे.

विविध टप्प्यांवर पायाभूत प्रकल्प

‘सागरमाला, भारतमाला, डेडिकेटेड प्रेट कॉरिडोर (डीएफसी)या सारख्या पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया वेगवेगळय़ा टप्प्यावर आली आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत मंत्रालय राज्य सरकारला पोर्ट इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट आणि स्किल डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमसाठी अर्थ साहाय्य देत असल्याचीही माहिती यावेळी दिली आहे.

मागील महिन्यात गती शक्ती लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या योजनेचे सादरीकरण केले होते.

Related Stories

लॉकडाऊन वाढवा : काही राज्यांची मागणी

Patil_p

समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट

Patil_p

पंजाबमध्ये निहंगी टोळक्याने तलवारीने तोडला पोलिसाचा हात

Patil_p

आम आदमी पक्षाला ईडीची नोटीस

Patil_p

नव्या बाधितांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p

उत्तर प्रदेशातील अपघातात 8 ठार

Omkar B
error: Content is protected !!