तरुण भारत

मध्यप्रदेशात ‘द बर्निंग ट्रेन’

भोपाळ / वृत्तसंस्था

दिल्लीहून छत्तीसगडला जाणाऱया दुर्ग एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. काही वेळातच 4 बोगी धुराने वेढल्या गेल्या. आग दुर्घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही. बोगींना आग लागल्याची माहिती मिळताच मोटरमनने एक्स्प्रेस थांबविल्यामुळे सुदैवाने अन्य बोगी सुरक्षित राहिल्या. तसेच सुदैवाने सर्व प्रवासी वेळेत टेनमधून बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या दुर्घटनेमुळे मुरैनाजवळील हेतमपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबवण्यात आली होती. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रेल्वे विभागाकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisements

Related Stories

डोंगराखाली 1200 वर्षे जुन्या नगराचे अवशेष

Amit Kulkarni

एसडीजी मानांकनात पुन्हा केरळ अव्वल

Amit Kulkarni

सामूहिक बलात्कार : दोषींना 20 वर्षांची कैद

Patil_p

देशात चोवीस तासात 3 हजार 390 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

“ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती का करत नाही?”

Abhijeet Shinde

LAC वर भारतीय सैन्यांने गोळीबार केल्याचा चीनचा दावा खोटा

datta jadhav
error: Content is protected !!