तरुण भारत

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा

वृत्तसंस्था/ जकार्ता

Advertisements

इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दक्षिण कोरियाच्या युजिनचा पराभव करत एकेरीची उपांत्यफेरी गाठली.

शुक्रवारी या स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विद्यमान विजेती तसेच सलग दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी सातव्या मानांकित पीव्ही सिंधूने दक्षिण कोरियाच्या सीम युजिनचा 14-21, 21-19, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. सिंधूला विजयासाठी तब्बल 66 मिनिटे झगडावे लागले. जपानची तेकाहेशी आणि थायलंडची इंटेनॉन यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध सिंधूची उपांत्य लढत होईल. 850,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचा बी. साईप्रणित आणि डेन्मार्कचा टॉप सीडेड ऍक्सेलसन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे. साई प्रणितने गुरुवारी दुसऱया फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या पोपोव्हचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. पुरुष दुहेरीत भारताचे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मलेशियाच्या फेई आणि इझुद्दिन यांच्याबरोबर होणार आहे.

Related Stories

जोकोविचला हरवून नदाल अजिंक्य

Patil_p

निवडकर्त्यांच्या मुलाखतीसाठी नवी सल्लागार समिती

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी रेफ्युजी संघनिवड जूनमध्ये

Amit Kulkarni

निकोल्सच्या नाबाद शतकाने न्यूझीलंड सुस्थितीत

Patil_p

भारत-द. आफ्रिका महिलांच्या टी-20 मालिकेला आज प्रारंभ

Patil_p

पालेर्मो महिलांची टेनिस स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!