तरुण भारत

एसटी कर्मचाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडली आहे. काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत कामावर रुजू झाले आहेत तर एसटीच्या विलीनीकरणावर ठाम असलेले कर्मचारी आज मध्यवर्ती बस स्थानकासमोर आंदोलन करत असताना शाहूपुरी पोलिसांनी या संपकरी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला आहे. जवळपास वीस कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

कोल्हापूर विभागातील संप अद्याप सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने कोल्हापुरातील एसटी सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. आज अकरापर्यंत अनेक एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत तर आज देखील काही कर्मचारी आंदोलन ठाम आहेत त्यातील काही कर्मचारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत होते. त्यावेळी शाहूपुरी पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकारामुळे कोल्हापूर विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दबाव टाकत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना कर्मचारी यांच्यावर दबाव येत असल्याचं आरोप काही कर्मचारी करत आहेत. दरम्यान एसटी आडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements

Related Stories

देशात उपासमारीची स्थिती चिंताजनक

Abhijeet Shinde

छत्तीसगड : राजधानी रायपूरमध्ये 9 ते 19 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन!

Rohan_P

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

datta jadhav

शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात साकारणार स्पोर्टस् कॉम्फ्लेक्स

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात उष्मा वाढला; पावसाच्या सरी कोसळल्या

Abhijeet Shinde

भाजपला मतं द्या, 50 रुपयांत दर्जेदार दारू देऊ

datta jadhav
error: Content is protected !!