तरुण भारत

प्रा. सुभाष सुंठणकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावचे ज्येष्ट विनोदी कथा-लेखक, रसायन शास्त्राचे माजी प्रा. सुभाष सुंठणकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. लोकमान्य ग्रंथालय, बुक लव्हर्स क्लब, शब्द गंध कवी मंडळ आणि गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे गुरुवारी हा कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनोद गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट व्यंगचित्रकार जगदीश कुंटे व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisements

 जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक करीत व्यासपीठावर विनोदी गायकवाड, विनोदी लेखक, आणि व्यंगचित्रकार असे विनोदाशी संबंधित तिघेजण उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर मंगेश देऊळकर यांनी सुभाष सुंठणकर यांचा परिचय करून दिला. अशोक अलगोंडी यांनी आपल्या दिलखुलास मुलाखतीत सुभाष सुंठणकर यांच्या आजवरच्या कार्याचा प्रवास उलगडून दाखविला.

बेळगाव परिसरातील सर्व मराठी साहित्य संमेलनाला आवर्जुन उपस्थित राहणारे आपले सुभाष सुंठणकर असा उल्लेख मालोजी अष्टेकर यांनी केला. प्रतिभा आपटे यांनी स्वरचित कविता सादर करीत सुंठणकर यांना भेटकार्ड दिले. अध्यक्षीय समारोपात साईकार प्रा. विनोद गायकवाड यांनी विनोद, विनोदी साहित्य यावर भाष्य करीत मजेशीर किस्से सांगितले. अश्विनी ओगले, किशोर काकडे, गुरुप्रशांत कुटे आदिनी विशेष परिश्रम घेतले. हृदयस्पर्शी अशा या कार्यक्रमाला विविध संस्थांचे सदस्य, मित्र परिवार मोठय़ा संख्येने उपस्थित होता. चारही संस्थातर्फे पुष्प कळकरंडी, श्रीफळ, शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. विद्या देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर गावडे यांनी आभार मानले.

Related Stories

नियमानुसार बकरी ईद साजरी करा

Amit Kulkarni

हुक्केरीत लसीकरणाची रंगीत तालीम

Patil_p

सुहासिनी महिला मंडळाचा तिळगूळ समारंभ

tarunbharat

आरपीडीमध्ये राष्ट्रीय वाचन सप्ताह

Amit Kulkarni

भारत विकास परिषदेतर्फे सामूहिक वंदे मातरम् गीत

Amit Kulkarni

पोलिसांशी चर्चा करून पुढील भूमिका मांडणार

Patil_p
error: Content is protected !!