तरुण भारत

आरपीडी महाविद्यालयाला ए मानांकन

न्यकचा  सदस्यांकडून महाविद्यालयातील सोयी -सुविधांची पाहणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

एसकेई सोसायटीचे राणी पार्वती देवी महाविद्यालय हे बेळगावातील प्रसिद्ध आणि नामवंत महाविद्यालय. उत्तम शैक्षणिक दर्जा, कुशल आणि दर्जेदार प्राध्यापक वृंद, भव्य आणि निसर्गरम्य ‘एनएएसी कडून ए’ श्रेणी प्राप्त महाविद्यालयीन उत्तम शिक्षण, सुंदर परिसर, भव्य क्रीडांगण, अद्ययावत आणि भव्य ग्रंथालय अशा सर्व सोयीनांयुक्त असे महाविद्यालय अशा अनेक गोष्टींसाठी संपूर्ण उत्तर कर्नाटक सोबत महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे. या सर्व घटकांची नोंद घेऊन यावषी महाविद्यालयाच्या स्वायत्त दर्जासाठी दि. 22 व 23 रोजी नोव्हेंबर रोजी युजीसीच्या समितीने महाविद्यालयाला भेट दिली. सर्व घटकांचे निरीक्षण केले. महाविद्यालयाच्या आतापर्यंतच्या विकासाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.  यूजीसी स्वायत्त समितीचे अध्यक्ष प्रा. अजय कुमारसिंग (कुलगुरू, श्री श्री विद्यापीठ, कटक) सदस्य-डॉ. वाय. अशोक (प्राचार्य, भारतीय विद्या भवनचे विवेकानंद कॉलेज ऑफ सायन्स, ह्युमॅनिटीज ऍण्ड कॉमर्स (स्वायत्त) सिकंदराबाद, तेलंगणा) प्रा. सतीश कुमार (राज्यशास्त्र विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय  मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली) विद्यापीठाचे प्रतिनिधी- प्रा. विजय एफ. नागन्नावार (इंग्रजी विभाग, आरसीयू, बेळगावी) डॉ. लता के. सी. (शिक्षण अधिकारी युजीसी-एस, डब्लू, आर, ओ बेंगलोर) यांचा समावेश होता.

यावेळी प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी महाविद्यालयाच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री किरण ठाकूर व सहकारी यांच्याबरोबर संवाद झाला. त्यानंतर महाविद्यालायच्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची माहिती सादर केली. आजी- माजी विद्यार्थी, प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा झाल्या. संध्याकाळी ‘देश एक रंग’ अनेक हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

त्यादरम्यान एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांनी स्वायत्त समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्थापन सदस्य,  संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते. दुसऱयादिवशी आय. क्मयू. एसी. वित्त, परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया विभाग इत्यादी विभागांची पाहणी झाली. या बौद्धीक संमेलनाची सांगता झाली.

Related Stories

होनगा येथील मंदिरांच्या ट्रस्टी- पुजाऱयाची चौकशी करा

Patil_p

मायाक्का चिंचलीसह सर्व मंदिरे बंद

Patil_p

हुबळी स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीए संघ विजयी

Amit Kulkarni

न्यायालय आवारात पार्किंगसाठी मार्किंग

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीचे अर्धवट काम चव्हाटय़ावर

Amit Kulkarni

सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब विजयी

Patil_p
error: Content is protected !!