तरुण भारत

सायबेरियात कोळसा खाणीत आग 52 जणांचा मृत्यू

मास्को

 रशियामधील सायबेरिया प्रांतात एका कोळसा खाणीत आग लागल्याने 52 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या मृत्यू तांडवात 6 मदत कार्यातील लोकांचादेखील समावेश होता असे कळते. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. शुक्रवारी आणखी 11 मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या 52 वर पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षातील घडलेली कोळसा खाणीतील आगीची ही यंदाची सर्वात मोठी घटना आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. सदरच्या दुर्देवी घटनेबाबत कॅमरोवो क्षेत्रात 3 दिवस दुःखवटा पाळला जात आहे. या घटनेतील जखमी 38 जणांवर अद्यापही इस्पितळात उपचार सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. यापैकी चौघांची परिस्थिती गंभीर आहे. धुरामुळे विषारी वायु पसरल्याने तेथील अनेकांना श्वास घेण्यात अडथळे जाणवले होते.

Advertisements

Related Stories

भारतीय लस खरेदीसाठी ब्राझीलची तत्परता

Patil_p

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 25 लाख 65 हजारांवर

prashant_c

भारत-चीनमध्ये आज चर्चेची 12 वी फेरी

Patil_p

गूढ बेटावर भीतीदायक बाहुल्या

Amit Kulkarni

अमेरिकेच्या चार खासदारांना चीनमध्ये बंदी

datta jadhav

मृत प्राण्यांचे मांस खाणारी महिला

Patil_p
error: Content is protected !!