तरुण भारत

लेबनॉनमध्ये बिघडलेल्या आर्थिक व्यवस्थेविरुद्ध जनतेचा आक्रोश

बेरुत

 सध्याला लेबनॉनची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. परिणामी देशात महागाईने कळस गाठला असून जनता आता याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मोर्चेकऱयांचा मोठा जमाव मंत्रालयात घुसला आणि तेथे त्यांनी तोडफोड केली. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींचा फोटोही काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. राजधानी बेरुतमध्ये मंत्रालयाची इमारत आहे. सदरच्या इमारतीत घसून मोर्चेकऱयांनी आतील साहित्याची नासधूस केली. पाऊंड चलनात सातत्याने घसरण होत असल्याने अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचा आरोप मोर्चेकऱयांनी केला आहे. गेल्या काही आठवडय़ात विविध वस्तूंच्या किमती भडकल्या आहेत. त्यात भर म्हणून सरकारने इंधन व काही औषधांवरील सबसिडी काढून घेतल्याने याविरुद्ध मोर्चेकऱयांनी आक्रोश व्यक्त केला आहे. त्यामुळे या वस्तू महागल्याने खरेदी करणे लोकांना न परवडणारे झाले आहे. पाऊंड चलनाचा दर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 25,100 पर्यंत घसरला आहे.

Advertisements

Related Stories

भारताने घाईत हटविले निर्बंध

Patil_p

म्यानमारच्या सैन्यावर गंभीर आरोप

Patil_p

मेहुल चोक्सी सुनावणीस अनुपस्थित

Patil_p

दुबई विमानतळावर आता ‘डोळय़ांचा’ खेळ

Patil_p

अमेरिका : 83,425 बळी

Patil_p

आगीमुळे बुडाली इराणची ‘खर्ग’ युद्धनौका

datta jadhav
error: Content is protected !!