तरुण भारत

किरकोळ भाजीपाला बाजारात आवक मंदावली

अवकाळी पावसाचा फटका, दर अवाक्मयाबाहेर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

मागील 15 दिवसात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने भाजीपाल्यावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने दरात देखील भरमसाठ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईबरोबर गृहिणीला भाजी-पाल्यांच्या वाढत्या दराचे चटके सहन करावे लागत आहे. किरकोळ भाजीपाला बाजारात आवक मंदावल्याने बीन्स, वांगी, मेथी, कारली, ढबू, सोले आदी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

शनिवारच्या किरकोळ भाजीपाला बाजारात बीनीस 60 रू. किलो, वांगी 40 रू., फ्लॉवर 20 ते 30 रूपये 1,  कारली 60 रू. किलो, ढबू 60 रू. किलो, सोले 70 रूपये शेर, गाजर 60 रू. कि., काकडी 60 रू. कि., बटाटा 25 ते 30 रू. कि., दुधी भोपळा 10 रू. 1, मेथी 10 रूपयाला 1 पेंडी, कोथिंबिर 10 रूपये 1, कांदापात 20 रूपयाला 5 पेंडय़ा, पालक 20 रूपयाला 4, शेपू 10 रूपयाला 1 पेंडी, टोमॅटो 30 रू. किलो, शेवग्याच्या शेंगा 600 रूपये किलो दराने विक्री सुरू होती.

शेवग्याच्या सेंगा खातात भाव

एरवी 10 ते 20 रूपयाला पाच शेंगाची पेंडी मिळणाऱया शेवग्याच्या शेंगांचा दर अवाक्मयाबाहेर गेला आहे. 600 रू. किलो दराने शेवग्याच्या शेंगा विक्री होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना शेवग्याच्या शेंगा खरेदी करणे कठिण झाले आहे.

आवक मंदावली

अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने भाजी पाला कुजला आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मंदावलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे काही भाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मिळेल ती भाजी खरेदी करावी लागत आहे. याबरोबरच भाजीपाल्याचे दर भरमसाठ वाढल्याने ग्राहक कडधान्य खरेदीला देखील पसंती देत आहेत.

Related Stories

बिग बॉस फेम सई लोकुर विवाहबद्ध

Patil_p

खानापूर तालुक्यातील शेतकरी गुंतले सुगी कामात

Patil_p

वर्दीच्या रिक्षाची चाके अजूनही थांबलेलीच!

Amit Kulkarni

चित्र प्रात्यक्षिकाला उदंड प्रतिसाद

Amit Kulkarni

अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

Amit Kulkarni

फुटपाथची खोदाई करण्यात आल्यामुळे झाडे कोसळण्याचा धोका

Patil_p
error: Content is protected !!