तरुण भारत

कोल्हापूर विभागातील ४५ एसटी कर्मचारी निलंबित; विभाग नियंत्रकांची कारवाई

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत होत असताना विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक वगळता जिल्ह्यातील सर्व आगारमधील एसटी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील अकरा आगारा मधील जवळपास ४५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश विभाग नियंत्रक पलंगे यांनी दिले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप राज्यभरात सुरू आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्यसरकार व्हावे, या मागणीवर एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, आज कोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत कामावर रुजू झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा अशांतः सुरू झाले. असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक आगार वगळता जिल्ह्यात आजही संप सुरू आहे.

त्यामुळे केवळ मध्यवर्ती बस स्थानक आगारातील कर्मचारी वगळता जिल्ह्यातील अकरा एसटी आगार मधील कर्मचाऱ्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, संभाजीनगर, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, कागल आगार मधील जवळपास ४५ कर्मचाऱ्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच एका रोजंदारी कर्मचाऱ्याला सेवा समाप्तीची नोटीसचे आदेश विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिले आहेत.

Advertisements

Related Stories

ग्रामपंचायती बिनविरोध करणाऱ्या गावांना अकरा लाखांचा निधी

Abhijeet Shinde

कोडोलीत रात्री सात पर्यन्त दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी

Abhijeet Shinde

दख्खनचा राजा जोतिबा मालिका केदार विजय प्रमाणेच

Abhijeet Shinde

कारवाईची भिती घालून 25 लाखांच्या लाचेची मागणी

Sumit Tambekar

तलाठी कार्यालये पडली ओस…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेत दुकान मालकासह पाच जणावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!