तरुण भारत

चिमुकल्यांना गोष्टी सांगतोय अल्फा मिनी

कुंगफूचे देखील धडे देतोय रोबोट

दक्षिण कोरियाच्या सुमारे 300 नर्सरी शाळांमध्ये मुलांना रोबोट देखील शिकवत आहे. हा रोबोट त्यांना गोष्टी सांगण्यासह नृत्य आणि कुंगफूचे धडे देखील देत आहे. या उपक्रमामुळे मुलांना प्री-स्कूलमध्येच रोबोट्ससोबत जुळवून घेणे सोपे ठरणार आहे. भविष्यात ही मुले जेव्हा स्वतःच्या कार्यक्षेत्रात दाखल होतील, तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उत्तमप्रकारे समजून घेऊ शकतील असे सरकारचे मानणे आहे.

Advertisements

नर्सरी स्कुल्समध्ये अल्फा मिनी रोबोट मुलामुलींचा विशेष वर्ग घेतो. मुले देखील अल्फा मिनी रोबोटच्या वर्गाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून आले ओ. मुलांना आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससोबत काम करावे लागणर आहे. अशा स्थितीत आताची ही पिढी पुढील 20 वर्षांनी जेव्हा जॉबमध्ये पोहोचतील, तेव्हा त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससोबत काम करण्याचा उत्तम अनुभव राहणार असल्याचे सोलचे स्थानिक प्रशासन हान डेंग यांचे म्हणणे आहे.

सृजनात्मकतेत प्रचंड वाढ

रोबोट्स मुलांच्या सृजनात्मकतेला चालना देतात. हा रोबोट स्वतःच्या पापण्या देखील हलवतो, मुलांशी बोलताना रोबोटचे डोळे हृदयाच्या आकाराचे होतात. रोबोटच्या माथ्यावर बसविण्यात आलेलया कॅमेऱयाद्वारे मुलाची छायाचित्रे त्याच्या टॅबलेटवर शेअर होतात असे सोलच्या मारू नर्सरीच्या शिक्षिका ब्यून सिओ यांनी म्हटले आहे.

Related Stories

बदक महिन्याला कमावतेय लाखो रुपये

Patil_p

‘नीरव’ कारनामे !

Amit Kulkarni

बकऱयाच्या वाढदिवशी बेंडबाजा

Patil_p

आदिवासींमधील ‘लिव्ह इन रिलेशन’

Amit Kulkarni

कोरोना संकटात योगा आवश्यक : तिजानी मोहम्मद बंदे

datta jadhav

धर्म कोणताही असो, रक्ताचे नाते एकच

Rohan_P
error: Content is protected !!