तरुण भारत

राशिभविष्य

28.11. 2021 ते 4.12.2021 पर्यंत

मेष

Advertisements

सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात तुमच्या जुन्या मित्रांची भेट मन प्रसन्न ठेवेल. अडचणीत असलेल्या नातेवाईकांना मदत करणे अशक्मय झाल्याने खेद वाटेल. नाते संबंधामध्ये काही गोष्टी पटवून देण्याकरता बराच संघर्ष करावा लागेल. स्वास्थ्यासंबंधी अगदी सामान्य समस्या असल्या तरीही त्याकडे वेळेवर लक्ष दिल्याने  पुढील त्रास वाचेल. गुडघ्याची व पाठीची दुखणी येऊ शकतील. अनेक बाबतीतील परिवर्तनाचा हा काळ तात्पुरता आहे. तो स्वीकारा. प्रेमसंबंधात भेदभाव न करता संतुलन आणा. आर्थिक विवादात समझोता. आर्थिक आवक वाढेल. कष्टाला पर्याय नाही. संयम धरा.

वृषभ

तुमच्या आयुष्यातील तुमच्या कुटुंबीयांचा अति हस्तक्षेप, जरी तुमच्या काळजीपोटी असला तरी टाळा. व्यायाम व योग तत्सम प्रकारावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या उत्साहाचा, ऊर्जेचा स्वतःसाठी व दुसऱयांसाठी उपयोग करा. प्रेमप्रकरणात चिंता सोडून नातेसंबंधाला नाव देण्याचा प्रयत्न करा. पैशाची चणचण तात्कालिक आहे. नातलगाकडून मदत मिळेल. करियरच्या बाबतीत तुमची कामे वेळेवर व व्यवस्थित होतील. नवीन कामाची जबाबदारी अंगावर पडेल. आनंदी रहाल.

मिथुन

कुटुंबातील आकस असणाऱया व्यक्तीशी सुसंवाद साधताना मीपणा सोडा. आनंद मिळेल. योग्य आहार व व्यायामाने ऊर्जा टिकवा. बिघडलेले नातेसंबंध दैवी कृपेच्या परीसस्पर्शाने चांगले दृढ होतील. कर्ज घेताना विचार करा. खर्चाचा ताळमेळ व्यावहारिक दृष्टीने बसवा. चंचलपणा सोडून मिळालेल्या संधीचे सोने करा. नोकरीत बदल करण्यासाठी योग्य वेळ आहे. नाहीतर मानसिक ताणामुळे खचून जाल.

कर्क

कुटुंबाकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या निर्व्याज प्रेमासाठी कृतज्ञ रहा. तुमचा उत्साह आणि ऊर्जा तुम्हाला व्यस्त ठेवेल. परंतु विश्रांतीपण घ्या. पेमप्रकरणात समस्यांना लपवून किंवा घाबरून न जाता एकमेकांचा आदर करून व्यावहारिकदृष्टय़ा नाते टिकवावे. आर्थिक बाबतीत नवीन साहस नको. कामाच्या बाबतीतला तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तारून नेईल. नवीन संधी मिळेल. ताणरहित पण भरपूर काम असा हा आठवडा जाईल.

सिंह

कुटुंबीयासोबत आनंदी क्षण घालवाल. कुटुंबाकडे लक्ष द्या. पूर्वीची नकारात्मकता शारीरिक व्याधीच्या रुपात प्रकटतात. म्हणून योग्य आहार व व्यायामाबरोबर सकारात्मकता ठेवा. प्रेमप्रकरणात तुम्ही पुढे जाताना आपला आत्मविश्वास व अभिमान याचा जोडीदाराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक आता फळाला आल्याचे जाणवेल. कर्ज आता नको. नोकरीसाठी अनुकूल काळ.

कन्या

कुटुंबीयाकडून तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्याने तुमच्यावरचा ताणही वाढला आहे. या आठवडय़ात कुटुंबात ताणतणाव जाणवेल. पण तुमच्या हुशारीमुळे तुम्ही यावर मात कराल. पूर्वीच्या काही अनुभवांची तुम्हाला अकारण भीती आहे. ती मनातून काढून टाकलीत तर तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सबळ व्हाल. सकारात्मकता ठेवा. आर्थिक स्थैर्य येईल. छोटय़ा गुंतवणुकीकरता काळ अनुकूल. नोकरीधंद्यामध्ये व्यावहारिकता ठेवा. कोणाकडूनही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका.

तूळ

आपल्या कुटुंबीयाकडून कोणतीही समस्या लपवून ठेवू नका. कुटुंबामध्ये एकमेकांना प्रेम, आदर द्या. तब्येत ठणठणीत राहील पण कुपथ्य टाळा. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने आठवडा आनंदाचा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण योग्य आर्थिक नियोजन हवे. करियरमध्ये सकारात्मकता येऊ लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामामध्ये आलेली सकारात्मकता हीच या यशाची गुरुकिल्ली असेल.

वृश्चिक

तुम्ही करत असलेले काम व इतर गोष्टी कौटुंबिक बाबतीत हस्तक्षेप करत आहेत व या सगळय़ामुळे, जबाबदाऱयांच्या ओझ्यामुळे ताण येत आहे. पण टोकाची भूमिका घेऊ नका. या सगळय़ामध्ये सुवर्णमध्य साधून तुम्ही सकारात्मकता आणाल. प्रेमसंबंधात आत्मपरीक्षण करून जोडीदाराला समजून घ्या. पुढच्या काही काळात आपल्यात नक्की सुसंवाद घडेल. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करून दीर्घकालीन गुंतवणूक केलीत तर ती फायद्याची ठरेल. करियरमध्ये जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने करण्याच्या आपल्या कलेचे कौतुक होईल. नवीन नोकरी स्त्रीवर्गाकडून मिळेल.

धनु

 कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षांचे दडपण न घेता त्यांना स्पष्ट शब्दात प्राप्त परिस्थिती समजावून सांगा. योग्य व्यायामामुळे  व आहारामुळे तब्येत उत्तम राहील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. कोणतीही गडबड न करता सुसंवाद साधा. अनाठायी खर्च नको. एक कर्जफेड करत असताना दुसरे कर्ज नको. करियरमध्ये दुसऱयावर विसंबून राहू नका. स्वकष्टानेच परतावा मिळेल.

मकर

कौटुंबिक आनंदाचा आठवडा. कुटुंबातील कोणत्या सदस्याशी विसंवाद झाला असेल तर सुसंवाद साधा. तब्येतीची नरमगरम अवस्था ही तात्कालिक  आहे. मन आनंदी ठेवा. सकारात्मकता ठेवा. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबरोबर उडणाऱया छोटय़ा छोटय़ा खटक्यांमुळे त्रास होईल. नवीन नात्याकरिता काळ अनुकूल नाही. करियरमध्ये योग्य निर्णय घ्या.

कुंभ

कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. बऱयाच दिवसानंतर कौटुंबिक गाठीभेटी होतील. तब्येतीकडे अति लक्ष देऊ नका. व्यायामाचा अतिरेक नको. प्रेमसंबंधात आपण नव्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल. आर्थिक बाबतीत कष्ट कमी पडू देऊ नका. आजच्या कष्टाचे फळ भविष्यात नक्की मिळेल. करियरच्या मागे धावताना इतरही जबाबदाऱयांचे भान असू द्या. नोकरी टिकविण्यासोबत मानसिक समाधानाकडेही लक्ष द्या.

मीन

कुटुंबात वाद व गैरसमज होण्याची शक्मयता, कौटुंबिक अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला सांभाळा. पूर्वीच्या काही चुकामुळे आताच्या शारीरिक व्याधी प्रकट होऊ लागल्या असल्या तरी त्या छोटय़ा आहेत. वेळेवर लक्ष द्या. अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करा. नुकसान होऊ नये याकडे लक्ष द्या. नोकरीत आपल्याला पेलेल एवढीच जबाबदारी उचला. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन नोकरी मिळू शकेल.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 12 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 सप्टेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 8 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी 2020

Patil_p
error: Content is protected !!