तरुण भारत

गुजरात किनारपट्टीजवळ मालवाहू जहाजांची धडक

अपघातानंतर तेलगळती – 43 जणांना वाचवले

गांधीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

गुजरातमधील कच्छमधील ओखा किनाऱयाजवळ भारतीय मालवाहू जहाजाची फिलिपाईन्सच्या जहाजाला धडक बसली. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर क्रू मेंबर्सनी भारतीय तटरक्षक दलाची मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही जहाजातील 43 क्रू मेंबर्सची सुटका केली. रात्रीच्यावेळी राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दुर्घटनेवेळी भारतीय मालवाहू जहाज अटलांटिक ग्रेसमध्ये 21 कर्मचारी होते. तर फिलिपाईन्सच्या जहाजामध्ये 22 क्रू सदस्य होते. या धडकेमुळे फिलिपाईन्सच्या  जहाजाचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तटरक्षक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका जहाजातून तेल गळती होत असून, ती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नौदलाचे तांत्रिक विभागाचे पथक शनिवारी दिवसभर घटनास्थळी ठाण मांडून होते. भारतीय प्रदूषण नियंत्रण जहाजही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच भावनगर अलंग शिपयार्डमधूनही तांत्रिक तज्ञांची टीम रवाना करण्यात आली होती.

Related Stories

दिल्लीसह परिसरात पावसाचा हाहाकार

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या नावे आणखी एक विक्रम

Patil_p

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P

दक्षिण काश्मीरमध्ये 24 तासात तीन चकमकी, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

उत्तराखंडात दिवसभरात 200 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

काश्मीरमध्ये कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p
error: Content is protected !!