तरुण भारत

एसटीचे 400 कर्मचारी कामावर हजर

-गुहागरातूनही सुटल्या 3 गाडय़ा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

जिह्यात एसटीचा संप सुरू असतानाच आता 400 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ यामुळे प्रत्येक आगारातून गाडय़ा सोडण्याच्या संख्येत वाढ झाली आह़े  शनिवारी गुहागर आगारातूनही 3 गाडय़ा सोडण्यात आल्य़ा  मात्र रत्नागिरी व मंडणगड आगारातून गाडय़ा सोडण्यात अडचणी निर्माण होत आहेत, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात शनिवारी 125 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े यामध्ये एकूण 1 हजार हून अधिक प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतल्याची नोंद करण्यात आली आह़े आतापर्यंत 400 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ पुढील 2 दिवसात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आह़े परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारपर्यंत कामावर हजर राहण्याची तंबी कर्मचाऱयांना दिली होत़ी यानंतर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्री यांनी दिले होत़े अद्यापही मोठय़ा संख्येने कर्मचारी हे संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत़ यामुळे पुढील दिवसांत कर्मचारी कामावर हजर न राहिल्यास एसटी प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आह़े

चिपळुणात 12 कर्मचारी कामावर हजर

चिपळूण एसटी कर्मचाऱयांनी आपल्या कामगिरीवर हजर व्हावे, या आवाहनाला बहुतांशी संपकऱयांनी नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर आगाराचे होणारे नुकसान तसेच प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने शनिवारी आगारप्रमुखानी संपकऱयांना चर्चेसाठी बोलावले असता त्यावर बहिष्कार टाकण्यात आला. संपकऱयांना सरकारने पगारवाढ केली असली तरी ती त्यांना मान्य नसून अद्यापही चिपळूण आगारातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यातील केवळ 12 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. उर्वरित कर्मचारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एकीकडे कर्मचारी संपावर ठाम असताना दुसरीकडे आगार प्रशासनाकडून या कर्मचाऱयांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन केले जात आहे. या आवाहनानंतर केवळ 12 कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱयांनी कामावर हजर होण्यास नकार दर्शवला आहे. आगाराचे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी संपकऱयांनी आपल्या कामावर हजर व्हावे, असे आवाहन शनिवारी चिपळूण आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी संपकऱयांना करत चर्चेसाठी बोलावले होते. मात्र त्यांनी नकार देत या चर्चेवर बहिष्कार टाकला.

                         गुहागरमधून 20 दिवसानंतर धावली एसटी

गुहागर एसटी कर्मचाऱयांच्या संपाला अखेर गुहागरमध्येही फूट पडल्याचे पहावयास मिळाले. शुक्रवारी 8 कर्मचारी कामावर रूजू झाले. परंतु शुक्रवारी एकही एसटी सुटली नाही. मात्र शनिवारी गुहागर-चिपळूण मार्गावर 12 वाजल्यापासून 3 फेऱया सोडण्यात आल्या. बुकींग पद्धतीने प्रवासीवर्गाला या मार्गावर सेवा देण्यात आली. तर शनिवारी एकूण 9 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे गुहागर आगाराचे दररोजचे सुमारे 8 लाखांचे नुकसान होत आहे. गुहागरमधील 354 कर्मचारी संपावर गेले होते. त्यातील 8 जणांनी शुक्रवारी आगारात हजेरी नोंदवली. हजर झालेल्या कर्मचाऱयांचे एसटी सेवा सुरू करण्याबाबतच्या नियोजनाचे मार्गदर्शन शुक्रवारी वरिष्ठ कार्यालयातून मिळाले नाही. यामुळे शुक्रवारी एकही एसटी सुटली नाही. परंतु शुनिवारी आणखी एका कर्मचाऱयाची हजेरी लागल्याने 9 कर्मचाऱयांच्या जोरावर शनिवारी गुहागर-चिपळूण मार्गावर 3 एसटी फेऱया सोडण्यात आल्या. गुहागर आगारात दाखल झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 3 पर्यवेक्षक, 2 प्रशासकीय, 1 कार्यशाळा तर 3 चालकांनी हजेरी लावली. तीनच चालक आल्याने गुहागर चिपळूण मार्गावरील 12 वाजताची, 12.30 वा. आणि 1 वा.ची एसटी फेरी सोडण्यात आली. वाहकाची हजेरी नसल्याने बुकींग पद्धतीने प्रवासीवर्ग एसटीमध्ये घेण्यात आला. यासाठी गुहागर, मोडकाघर व शृंगारतळी येथे बुकींग घेण्यात आले. वाहकाविना धावणाऱया या 3 फेऱयांना चिपळुणमधूनही बुकींग घेऊन या तीन फेऱया परतल्या. 20 दिवसानंतर गुहागर आगारातून सुटलेल्या या फेरीचे शृंगारतळी येथे प्रवासीवर्गाने जोरदार स्वागत केले.

कर्मचाऱयांनी कामावर हजर व्हावे आगारप्रमुख कांबळे

एसटी महामंडळाचा कर्मचारी हे मुख्य बलस्थान आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार पातळीवर त्यांचा लढा सुरू आहे. परंतु तालुक्यातील सर्वसामान्य प्रवासी वर्गाची यामध्ये गैरसोय होत आहे. यामुळे कर्मचाऱयांनी कामावर हजर व्हावे, असे आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी बोलताना सांगितले. शनिवारी एकूण 9 कर्मचारी कामावर हजर झाले. रविवारी पुन्हा कर्मचारी हजर होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. जर वाहक हजर झाले तर आबलोली, वेळणेश्वर मार्गावर एसटी फेरी सोडता येईल, असे मत व्यक्त केले.

                                     मंडणगडात संपाचेच वातावरण 

मंडणगड ः परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर विविध डेपोचे कामकाज सुरु झाले. मात्र मंडणगड आगारातील कर्मचारी कामावर न परतल्याने शनिवार मंडणगड बसस्थानकात शुकशुकाट दिसला. दापोली डेपोचे कामकाज काही अंशी सुरु झाल्याने तेथील गाडय़ा मात्र बसस्थानकात आल्या होत्या. आगारात 2 मॅकेनिक कामावर आले होते, अशी माहिती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी दिली.

                                      राजापूर आगारातील 22 कर्मचारी रूजू               

राजापूर एसटी कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राजापूर आगारातील तांत्रिक कार्यशाळेतील 18 व 4 चालक वाहक असे 22 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे राजापूर आगारातील एसटी कर्मचारी संपात फुट पडल्याचे दिसत आहे. एकाच दिवशी तब्बल 22 कर्मचाऱयांनी या आंदोलनातून माघार घेत कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला व ते रूजू झाले आहेत. यात तात्रिक कार्यशाळेतील 18 व 3 चालक व एका वाहकाचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱयांना तत्काळ रूजू करून घेण्यात आल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. त्यामुळे शनिवार अखेर एकूण हजर कर्मचाऱयांची संख्या ही 41 इतकी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कर्मचारी हजर झाल्याने राजापूर आगारातून शनिवारी 11 एसटी बस सोडण्यात आल्या. यामध्ये राजापूर हातदे, पाचल आंबा, बुरंबेवाडी, नाटे, तारळ, राजापूर जांभवली या मार्गावर प्रवाशांना ने आण करण्यासाठी या फेऱया सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली. शासनाकडून पगार वाढीबाबत झालेला निर्णय व भविष्यात होणारे निर्णय लक्षात घेऊन सर्व कर्मचाऱयांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले आहे.

Related Stories

वेंगुर्ल्यातून 300 मजूर मार्गस्थ

NIKHIL_N

शंभरहून अधिक घरांतील गणपती यंदा मुंबईत

NIKHIL_N

नीट परीक्षेला जाणे होणार सोपे

NIKHIL_N

स्वगृही परतण्यासाठी तमिळ विद्यार्थी आक्रमक

Patil_p

सोळा हजार ‘कोरोना लस’ उपलब्ध

NIKHIL_N

दुचाकी दरीत कोसळून तरुण ठार

Patil_p
error: Content is protected !!