तरुण भारत

कोकण मार्गावर ख्रिसमससह नववर्षासाठी 4 स्पेशल धावणार

प्रतिनिधी/ खेड

नाताळ सुट्टीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या 4 साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडय़ा 18 डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल या गाडय़ांचा समावेश आहे. पूर्णपणे आरक्षित असणाऱया या स्पेशल गाडय़ांच्या 42 फेऱया धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत.

Advertisements

01287/01288 क्रमांकाची दादर-थिविम साप्ताहिक स्पेशल 18 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत दर बुधवारी व शनिवारी धावेल. दादर येथून रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी 1 वाजता थिविमला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरूवारी व सोमवारी थिविम येथून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटून त्याचदिवशी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी दादरला पोहोचेल. 17 डब्यांच्या स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभवावाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी थांबे आहेत.

01290/01289 क्रमांकाची थिविम-पनवेल आठवडय़ातून 3 दिवस धावेल. 18 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत दर बुधवारी, शनिवारी व रविवारी थिविम येथून दुपारी 1.30 वाजता सुटून त्याचदिवशी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरूवारी, रविवारी व सोमवारी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटून त्याचदिवशी दुपारी 1 वाजता थिविमला पोहोचेल. 17 डब्यांची ही गाडी सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, माणगाव, रोहा या स्थानकांवर थांबेल.

01291/01292 क्रमांकाची पुणे-करमाळी स्पेशल 17 ते 7 जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी धावणारी स्पेशल पुणे येथून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी सकाळी 6 वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी करमाळी येथून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी पुणे येथे पोहोचेल. 22 डब्यांच्या या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आदी स्थानकांवर थांबे आहेत.

01294/01293 क्रमांकाची करमाळी-पनवेल 18 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत दर शनिवारी धावेल. करमाळी येथून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुटून त्याचदिवशी रात्री 8 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून शनिवारी रात्री 10 वाजता सुटून सकाळी 6 वाजता करमाळीला पोहोचेल. 22 डब्यांची ही गाडी थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, स्थानकांवर थांबेल.

कोकण मार्गावर 3 नियमित गाडय़ांना मुदतवाढ

कोकण मार्गावरून धावणाऱया मांडवी व कोकणकन्या एक्सप्रेसपाठोपाठ आणखी तीन नियमित गाडय़ांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजरसह दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा समावेश आहे. पूर्णपणे अनारक्षित 50103/50104 दिवा-रत्नागिरी व 10105/10106 10 अनारक्षित तर 4 आरक्षित डबे असलेली दिवा-सावंतवाडी नियमित एक्सप्रेस 1 डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावेल. 50107/50108 सावंतवाडी-मडगाव नियमित पूर्णपणे अनारक्षित पॅसेंजरही पुढील सूचनेपर्यंत कायम धावणार आहे.

Related Stories

जिल्हय़ात दोन लाख 48 हजार 186 जणांनी घेतला पहिला डोस

NIKHIL_N

सफाई कर्मचारी अल्प मानधनावर

NIKHIL_N

केंद्राकडून मोठे पॅकेज देणार!

Patil_p

मुलीवर अत्याचारप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास

tarunbharat

रत्नागिरी जिह्यात 48तास वीज ठप्प, पाण्याविना हाल

Patil_p

अडूरमधील चोरटे 36 तासांत गजाआड

Patil_p
error: Content is protected !!