तरुण भारत

अधिवेशनावेळी सर्वांची योग्यप्रकारे सोय करा!

कोणत्याही तक्रारी येऊ नयेत याची दक्षता घ्या

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे. अधिवेशनाच्या तयारीला सर्वजण लागला आहात. असे असले तरी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वच अधिकाऱयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बेंगळूरहून आलेल्या सर्व मंत्री तसेच आमदार व अधिकाऱयांची योग्यप्रकारे सोय होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने वेळेत आणि काळजीपूर्वक तयारी करावी, अशा सूचना जिल्हय़ाचे प्रभारी सचिव आणि राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभागाचे सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी अधिवेशनाबाबत सूचना केल्या. प्रत्येक मंत्री तसेच आमदारांचा पाहुणचार योग्यप्रकारे झाला पाहिजे. त्यांच्या राहण्याची सोय, वाहनांची सोय वेळेत आणि योग्यप्रकारे करावी, असे सांगितले. जेवणाबाबत बऱयाचवेळा तक्रारी येतात. त्या तक्रारी येऊ नयेत यासाठी योग्य जेवण द्यावे, कोणतीही तक्रार येऊ नये यादृष्टीने प्रत्येक अधिकाऱयाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

अधिवेशन काळात जी आंदोलने होणार आहेत त्यावेळेला चोख सुरक्षा व्यवस्था ठेवणे महत्त्वाचे आहे. आंदोलन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय तसेच इतर सोयी-सुविधा उपलब्ध करा. महत्त्वाचे म्हणजे आंदोलनांदरम्यान महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनाबाबत पूर्व माहिती घेऊन प्रथमच अधिक सुरक्षा घेणे महत्त्वाचे आहे. आंदोलनकाळात कोणतीही हिंसक घटना घडू नये यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. कोविडचे नियम पाळत प्रत्येक काम झाले पाहिजे. कोविडसंदर्भात सभापती तसेच अध्यक्षांशीही अधिकाऱयांनी चर्चा करावी. जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.

सुवर्ण विधानसौधमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे. सर्वत्र स्वच्छता ठेवा. महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या टाक्मयांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱयांनी आतापासूनच कामाला लागावे, अशी सूचना त्यांनी केली. सुवर्णसौधमध्ये ई-कार्यालयामध्ये सर्व पायाभूत सुविधा उभारणे महत्त्वाचे आहे. अधिवेशनादरम्यान इंटरनेट कनेक्शन, संगणक आणि ई-ऑफिस कार्यक्षमता योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असेही ते म्हणाले.

अधिवेशनकाळात अधिकारी तसेच मंत्र्यांच्या प्रवासासाठी योग्य नियोजन करावे. जेवण, नाष्टा याबाबत समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली. तक्रार व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीदेखील जिल्हाधिकाऱयांनी दिली.

बेंगळूरहून आलेल्या सर्व अधिकाऱयांची तसेच कर्मचाऱयांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याबाबत नियोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री, सभापती, मंत्री, आमदार तसेच वरि÷ अधिकाऱयांची योग्य सोय करणे महत्त्वाचे असून अधिकाऱयांनी त्यासाठी काळजी घ्यावी, अशी सूचना हुबळी, धारवाड महानगर धोरण आयुक्त डॉ. सुरेश इटनाळ यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी यांनी शहरातील सर्व हॉटेल्स व लॉज मालकांची बैठक घेण्यात आली आहे. त्या सर्व लॉजमध्ये राहण्याची सोय करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी अधिवेशनकाळात उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व आवश्यक तयारी केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सर्व अधिकारी व मंत्र्यांच्या वाहनांची सोय करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले.

या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., शशीधर कुरेर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कोगनोळी अंबिका मंदिरात बनशंकरी उत्सव

Omkar B

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p

बसेस रस्त्यांवर …प्रवासी घरात

Patil_p

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली

Amit Kulkarni

सत्तेची चावी मतदारांच्या हाती !

Omkar B

अग्निहोत्र : पर्यावरण रक्षणाचा उपयुक्त विधी

Amit Kulkarni
error: Content is protected !!