तरुण भारत

‘भविष्यात सत्तेत राहायची इच्छा नाही, कारण…’; मोदींनी केली ‘मन की बात’

दिल्ली/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमामध्ये देशवाशीयांशी संवाद साधताना मी आता पण सत्तेत नाही आणि भविष्यात देखील सत्तेत राहायची इच्छा नाही. मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मला पंतप्रधान पद हे सत्ता म्हणून महत्वाचं वाटत नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, मोदींनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी राजेश कुमार प्रजापती या व्यक्तीने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार झाल्याने त्याने मोदींचे आभार मानले. तसेच त्यांना सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मोदी म्हणाले, ”मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यात पण सत्तेत राहायची इच्छा नाही. कारण मला जनतेच्या सेवेत राहायचं आहे.” तसेच यावेळी त्यांनी आयुष्मान भारत योजनेचं महत्व सांगितलं. प्रत्येकाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवायला पाहिजे. पैशामुळे उपचार मिळत नाहीत, असं व्हायला नको. कुटुंबातील सर्वांना कार्ड बनवायला सांगा. त्यामुळे खासगी रुग्णालयात देखील उपचार घेता येतील, असं मोदी म्हणाले.

Advertisements

Related Stories

भारतातील 10 हजार दिग्गज व्यक्ती, संस्थांवर चीनकडून पाळत

datta jadhav

कोरोनामुळे यंदाही भाविकांशिवाय निघणार पुरी रथयात्रा

Abhijeet Shinde

पीएमकेचाही एनआरसीला विरोध

Patil_p

रस्त्याची कामे भ्रष्टाचार मुक्त अन् दर्जेदार झाली पाहिजेत : गडकरी

datta jadhav

लान्स नाईक तेजाच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत; CM ची घोषणा

datta jadhav

तहव्वूर राणाला अमेरिकेत पुन्हा अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!