तरुण भारत

शेतकऱ्यांनो सोयाबीन विकू नका – राजू शेट्टी

अजून थोडे दिवस थांबल्यास निश्चितच हा दर ८,५०० रूपयाच्या पुढे जाईल

सांगली / प्रतिनिधी

Advertisements

सरकारी धोरणामुळे कोसळलेले सोयाबीनचे दर पुन्हा सावरू लागले आहेत. पडलेल्या दराने सोयाबीन विकायचा नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने गेले वीस दिवसात व दर दोन ते अडीच हजारने वाढले आहेत. दर लवकरच साडेआठ हजार रुपये क्विंटल वर पोहोचेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

याबाबत राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, ११ हजार रूपये क्विंटलने बाजारात सोयाबीनला दर होता. ज्यावेळेस शेतकर्यांच्या शिवारातील सोयाबिन बाजारात येऊ लागला. त्यावेळेस केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तो जवळपास ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी हा कोसळलेला दर पाहून पुन्हा एकदा हतबल झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ नोव्हेंबर पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भात जनजागृती मेळाव्यासह, विविध आंदोलने, उपोषण करून सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे काढण्यात आले. सरकारचे धोरण व व्यापा-यांच्या संगनमतामुळे कवडीमोल दराने विकला जाणारा सोयाबिन न विकण्याचे आवाहन या जनजागृती सभा व मोर्चामध्ये करण्यात आले.

वीस दिवसातच ४ हजार रूपये क्विंटलने विकला जाणा-या सोयाबिनचा दर आज ६ हजार ५०० रूपये वर गेला व तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे. असे सांगून शेट्टी पुढे म्हणतात, अजूनही राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती की, सोयाबिन आयात थांबविणे, जीएसटी रद्द करणे, निर्यात अनुदान वाढविणे यासह विविध मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. आपण आपला सोयाबिन न विकता अजून थोडे दिवस थांबल्यास निश्चितच हा दर ८५०० रूपयाच्या पुढे जाईल. अवघ्या वीस दिवसात क्विंटलमागे जवळपास दोन ते अडीच हजार रूपये जादा दर राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकर्यांना मिळू लागला. हा स्वाभिमानीच्या अथक प्रयत्नामुळे झालेल्या जनजागृतीचा विजय आहे. असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Related Stories

मराठा आरक्षणाचा लढा सर्वांनी ताकदीने लढूया

Patil_p

ओमिक्रॉन बाधितांपैकी ५० टक्के रुग्ण लसीचे दोन्ही डोस घेतलेले

Sumit Tambekar

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

पालिकेच्या वसुंधरा अभियानाचा फियास्को

Patil_p

टाऊनहॉलला वडापचा विळखा

Patil_p

पुणे विभागात 101 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

prashant_c
error: Content is protected !!