तरुण भारत

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा लंबोर्गिनी डान्स व्हायरल

तरुण भारत ऑनलाईन टीम

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहेत. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं २९ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत.दरम्यान मुलीच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Advertisements

या संगीत कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यासोबत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. हा संगीत कार्यक्रम रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्येआयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.

Related Stories

महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर

Abhijeet Shinde

मुंबईत अनेक ठिकाणी बत्ती गुल; रेल्वे सेवा ठप्प

Rohan_P

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ मदत द्या ; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Abhijeet Shinde

वानखेडेंची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

datta jadhav

राज्य सरकार मराठा समाजासोबत; मोर्चे काढू नका

datta jadhav

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!