तरुण भारत

गौतम गंभीरला एका आठवड्यात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

दिल्ली/प्रतिनिधी

भाजप खासदार आणि आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना एकाच आठवड्यात तिसरी धमकी मिळाली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIS) काश्मीरच्या ईमेल आयडीवरून गंभीर यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गौतम गंभीरला पाठवलेल्या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे म्हटले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असंही त्या मेलमध्ये लिहिलं आहे.

गौतम गंभीरला आठवडाभरात तिसरी धमकी मिळाली आहे. 23 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. पण 24 तारखेला त्याला पुन्हा एक ईमेल आला, ज्यामध्ये ‘काल तुला मारणार होतो पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’ असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला ISIS काश्मीरने दिल्याचा आरोप आहे.

धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यांनतर गंभीरनेच पोलिसांकडे तक्रार केली होती. दोनवेळा गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आला होता. गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचे समोर आले होते.

Advertisements

Related Stories

कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

datta jadhav

श्रीलंका दौर्‍यासाठी इम्रान खान करणार भारतीय हवाई क्षेत्राचा वापर

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 11, 739 वर

Rohan_P

कोरोनाचा उद्रेक, कोल्हापूर जिल्हय़ात 11 बळी!

Abhijeet Shinde

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

datta jadhav
error: Content is protected !!