तरुण भारत

सोनवडे येथे एसटीवर अज्ञात व्यक्तींनी केली दगडफेक

कोकरूड/प्रतिनिधी

सोनवडे ता. शिराळा येथील बस स्टॉपवर, एसटीवर सकाळी साडे दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली असून याबाबतचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोकरूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोनावडे येथील सिद्धार्थनगर बस स्टॉपवर सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास शिराळा आगाराची मणदूर-इस्लामपूर गाडी क्रमांक MH४० AQ ६३०१ ही एसटी मणदूरहुन येत होती. यावेळी सोनावडे येथे आली असता गाडीवरती अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेची नोंद कोकरूड पोलिसात झाली असून तक्रार चालक राहुल भगवान माळी रा. रेठरे धरण यांनी दिली आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर हे तर ‘बंडलबाज’

Abhijeet Shinde

सांगलीतील ‘त्या’ खुनाचा सहा तासात लावला छडा

Abhijeet Shinde

सांगली : आष्ट्यात सोमवारी शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन

Abhijeet Shinde

सांगलीत बुधवारी अपुरा पाणीपुरवठा

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचे बोगस प्रमाणपत्र देणारा ‘सिनर्जी’चा कर्मचारी जाळ्यात

Abhijeet Shinde

सांगली : कोयना धरणावर मिळाला तब्बल नऊ फुटी अजगर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!