तरुण भारत

अ‍ॅग्री डेल्वपमेंट अ‍ॅप विरोधात सायबर क्राईमकडे तक्रार अर्ज

संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता: जिह्यातील अनेकांची झाली फसवणूक

प्रतिनिधी/सातारा

Advertisements

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या होत्या. अनेकजणांचे व्यवसाय बुडाले होते. त्यामध्ये काहीजण कमी कष्टात पैसा जास्त कसा मिळेल हे शोध होते. याच संधीची काहीजण वाट पहात होते. जाळे टाकून बसलेल्या त्या हुशारांना सातारा जिह्यातील अगदी सर्वसामान्यांपासून शिकलेली मंडळी बरोबर गळाला अडकली आहेत. अगदी पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक अ‍ॅग्री डेव्हलपमेंट अ‍ॅपमध्ये गुंतवणूक केलेली मंडळी जिह्यात आहेत. सातारा शहर पोलीस ठाणे आणि सायबर पाईमकडे या अ‍ॅपविरोधात एक तक्रार अर्ज आलेला असून आणखी अनेक तक्रार अर्ज जाण्याची शक्यता आहे. तसेच गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅग्री डेव्हलमेंट याअ‍ॅपवर सभासद होण्यासाठी केवळ पाचशे रुपये लागत असत. आणि आपल्या जवळच्या कोणाला सभासद केल्यास त्यास रिवॉर्ड मिळायचे. त्यामुळे काहींनी आपल्या कुटुंबातील आपल्या जवळच्या नातलगांना या अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडले. जिह्यात बघताबघता हे जाळे अगदी ग्रामीण भागात पोहचले. लॉकडाऊनच्या काळात अगदी याचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, झुम मिटींगद्वारे बैठका घेवून अधिकअधिक गुंतवणूक करण्यासाठी एकमेकांना प्रवृत्त करत होते. त्यामुळे जिह्याच्या कानाकोपऱयापर्यंत या ऍपचे सभासद झाले.

परंतु जसे हे अ‍ॅप बंद पडले तशी सगळय़ांची झोप उडाली तर काहीजणांनी 500 रुपये लावले अन् लगेच खेळ बंद केला त्यामुळे त्यांनी वाचलो म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. जिह्यात अग्री डेव्लपमेंट या अ‍ॅपमधून अनेकांची फसवणूक झाल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा असून एक तक्रार अर्ज सायबर क्राईम विभाग आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातकडे एकाने केलेला आहे. ज्याने तक्रार अर्ज केला आहे त्याची तर तब्बल 74 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. तो साताऱ्यात एका क्लासेसमध्ये शिक्षक असून त्याची टेलीग्रामवर लॉकडाऊनच्या काळात सारा नावाच्या महिलेसोबत गप्पा मारत असताना त्या महिलेने या अ‍ॅपची माहिती दिली अन् त्यांनी त्या अ‍ॅपचे सभासद होवून गुंतवणूक केली, असे त्या तक्रार अर्जात म्हटले आहे. जिह्यात या अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक झालेले आता सायबर क्राईम आणि पोलीस ठाण्याकडे तक्रारी करु लागले आहेत. त्या अ‍ॅपवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Related Stories

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणची दिव्यांगांच्याप्रती अनास्था

Abhijeet Shinde

सातारा : रयत शिक्षण संस्थेसमोर अभाविपने केली निदर्शने

Abhijeet Shinde

बोरगाव पोलीस ठाण्यात रंगली ‘मेहंदी रस्म’

Omkar B

साताऱ्यातील कोरोना निर्बंध म्हणजे मोरीला बोळा अन् दरवाजा उघडा

Abhijeet Shinde

सातारा : गौरी आणि घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात

Abhijeet Shinde

स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृहासाठी 7 कोटी 69 लाखाचा निधी मंजूर

Amit Kulkarni
error: Content is protected !!