तरुण भारत

वृद्ध महिलेने गायीसोबतच केला विवाह

प्राण्याच्या स्वरुपात पतीच्या पुनर्जन्माचा दावा

भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये पुनर्जन्म होत असल्याची श्रद्धा आहे. माणूस कुठल्या न कुठल्या रुपात पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत असल्याचे लोक मानतात. कंबोडियातील एका महिलेसोबत असेच घडले आहे. तिने एका गायीला स्वतःच मृत पती मानत तिच्यासोबत विवाह केला आहे. आपल्या पतीने गायीच्या स्वरुपात जन्म घेतल्याचे महिलेचे मानणे आहे.

Advertisements

कंबोडियाच्या क्राटी प्रांतात राहणाऱया 74 वर्षीय खिम हँग स्वतःच्या भागात प्रसिद्ध झाल्या आहेत. गायीमधील सर्व वैशिष्टय़े माझ्या मृत पतीप्रमाणेच आहेत असे  महिलेचे म्हणणे आहे. महिलेच्या गायीसोबतच्या विवाहाची चित्रफित उपलब्ध नसली तरीही गावातील बहुतांश लोक हा विवाह पाहिल्याचे आणि त्यात सामील झाल्याचा दावा करतात.

गायीची सेवा करण्याची ताकीद

महिला आता गाईला स्वतःचा पती समजून प्रेम करते. तिने गाईला स्वतःच्या पतीचीच उशी दिली आहे. इतकेच नाही तर महिलेच्या घरात गाय सोबत राहते. खिमने स्वतःच्या मुलांना गाईची सेवा करण्याची ताकीद दिली आहे. गाय हेच आपले वडिल असल्याचे मानून ते देखील गाईची मोठी सेवा करतात. मी मेल्यावर गाईला स्वतःच्या वडिलांप्रमाणे प्रेम द्या, तिला कधीच विकू नका, तिला चांगले खायला द्या, गाईचा मृत्यू झाल्यास तिच्यावर माणसांप्रमाणे अंत्यसंस्कार करा असे खिमने मुलांना सांगितले आहे.

Related Stories

पुणे : दहीहंडी फोडून वृध्द महिलांनी दिला निरोगी भारताचा संदेश

Rohan_P

मुसळधार पावसात मुक्या प्राण्यांचे ‘छत’

Amit Kulkarni

आठवीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिका गेली पळून

prashant_c

सोने-चांदीची झळाळी उतरली !

prashant_c

माकडांसाठी वृक्ष असलेला विशेष ब्रिज

Amit Kulkarni

190 वर्षांचा झाला ‘जोनाथन’

Patil_p
error: Content is protected !!