तरुण भारत

देशद्रोहप्रकरणी शरजील इमामला दिलासा

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन

वृत्तसंस्था/ प्रयागराज

Advertisements

सीएए-एनआरसी विरोधी निदर्शनांदरम्यान अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कथितपणे ‘देशविरोधी भाषण’ करणाऱया शरजील इमामला  देशद्रोहाच्या गुन्हय़ाप्रकरणी शरजील इमामला जामीन मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असला तरीही त्याचा विस्तृत आदेश अद्याप तुरुंग प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

शरजीलवर भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांच्या विरोधात द्वैष फैलावणे, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष निर्माण करणे, देशाची एकात्मता अन् सार्वभौमत्वाला धोक्यात आणण्याशी संबंधित आरोप आहेत.

जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि शाहीन बागमध्ये झालेल्या सीएए विरोधी निदर्शनांच्या प्रमुख आयोजकांपैकी एक शरजीलला मागील वर्षी बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित हिस्स्यांपासून तोडण्याचे विधान करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी शरजीलच्या विरोधात मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात एफआयआर नोंदविण्यात आला होता. पण आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील गुन्हय़ांप्रकरणी त्याला पूर्वीच जामीन मिळाला आहे.

शरजील सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर देशद्रोहासह दिल्ली दंगलीचा कट रचणे आणि जामियामध्ये हिंसाचार फैलावण्याचाही आरोप आहे.

Related Stories

आसाममध्ये ‘दादा’, प. बंगालमध्ये दीदी ?

Amit Kulkarni

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीपार

Patil_p

ब्रह्मज्ञान झालेले नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावे

Patil_p

महाराष्ट्रापुढे पुन्हा दंगलींचे आव्हान?

Patil_p

पाकिस्तानच्या सैन्याला राजकीय आव्हान

Patil_p

कोरोना चाचणीसाठी एक कोटी ‘किट’

Patil_p
error: Content is protected !!