तरुण भारत

दिशाचे नाक झाले सरळ

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. दिशा ही सोशल मीडयावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहत्यांचेही त्यांच्या आवडत्या कलाकारांवर किती बारीक लक्ष असते याचा अनुभव दिशाने घेतला. चाहते केवळ व्हिडिओ बघतात त्यावर कमेंट करतात आणि पुढे जातात असं नसतं, तर कलाकारांमधील बारीकसा बदलही त्यांच्या चाहत्यांच्या नजरेतून सुटत नाही हेच खरे. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. दिशा तिच्या नव्या चित्रपटाच्या क्रीनिंगसाठी पोहोचली होती. इथला दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी तिने सर्जरी केली असं नेटकऱयांच म्हणणं आहे. दिशाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. दिशा यात सुंदर दिसत असली तरी यावेळी तिचा हा व्हिडीओ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये दिशाने तिच्या नाकावर सर्जरी केल्याचे दिसत असल्याने तिच्या चेहऱयात फरक पडला आहे. यावरूनच या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशीपमुळे दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. ही जोडी नेहमी एकत्र दिसत असल्याने त्यांच्यात काहीतरी गोडगुपित आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. अजून तरी या दोघांनी काहीच जाहीर केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या प्रंटसीटवरही दिशाचे दर्शन झाले होते आणि त्यावरूनही खूप चर्चा झाली होती. असो, दिशाने कुणासोबत फिरावं हा तिचा निर्णय आहे. पण सध्या तरी तिने नाकावर केलेल्या सर्जरीमुळे तिचे नाक सरळ झालेय.

Related Stories

केंद्रीय मंत्र्यांची कन्या अभिनयाच्या क्षेत्रात

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : रीया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर

Rohan_P

महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ‘भाडिपा’ आणणार डिजिटल माध्यमांवर

Patil_p

डॉक्टर डॉनमध्ये ऐन पावसाळय़ात साजरा होणार व्हॅलेंटाईन्स डे

Patil_p

चिरंजीवीच्या चित्रपटात तमन्नाची वर्णी

Patil_p

शिल्पा शेट्टीच्या घरावर मुंबई पोलिसांचा छापा

Rohan_P
error: Content is protected !!