तरुण भारत

आलियाने घेतले तब्बल 6 कोटी

अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या भूमिकेइतकीच चर्चा असते ती त्यांच्या मानधनाची. सध्याचा कोण सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे हे जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. अमूक कलाकाराने चित्रपटासाठी इतके घेतले मानधन. 30 सेकंदाच्या जाहिरातीसाठी अमूक सेलिब्रिटीने घेतले इतके कोटी अशा बातम्या नेहमीच झळकत असतात. यामध्ये आता भर पडली आहे ती आलिया भट हिची. खरंतर आलिया भट हिच्या सामान्यज्ञानावर खूप सारे मीम्स आणि विनोद सोशलमीडियावर व्हायरल होत असतात. पण सिनेमाची निवड करणे आणि त्यातील भूमिकेला न्याय देण्यात आलियासारखी हुशार अभिनेत्री नाही, हे मात्र आपल्याला मान्य करावेच लागेल. एका सिनेमासाठी आलियाने 6 कोटी रुपयांची मागणी केली आणि निर्मात्यांनी ती मागणी मान्य केली. आलिया मुख्य भूमिकेत असेल म्हणून जास्त मानधन घेतले असेल पण असंही नाही. या सिनेमात आलियाने संपूर्ण शेडय़ुलमध्ये फक्त दहा दिवस काम केलय जी पडद्यावर फक्त दहा मिनिटांची भूमिका आहे आणि त्यासाठी तिने 6 कोटांची तगडी रक्कम घेतली आहे. हा सिनेमा दाक्षिणात्य असून खरं तर दाक्षिणात्य सिनेमातील मुख्य नायिकेलाही इतकी रक्कम देण्यासाठी निर्माते तयार नसतात, पण आलियाची मागणी मात्र एका झटक्यात मंजूर झाली. लवकरच हा सिनेमा पडद्यावर येणार आहे.आलियाचा हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा आहे. यात तिच्यासोबत अजय देवगण क्रिन शेअर करणार असून त्याचाही हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा आहे.

Related Stories

30 एप्रिलला ‘सुर्यवंशी’ झळकणार

Patil_p

व्हायरस मराठीचा लॉकडाऊन फिल्म फेस्टिव्हल

Patil_p

आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर’

Patil_p

डॉक्टर डॉनमध्ये दिसणार सागर कारंडे

Patil_p

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

Rohan_P

आगामी चित्रपटात सुबोध भावे पहिल्यांदाच साकारणार हटके भूमिका

Sumit Tambekar
error: Content is protected !!