तरुण भारत

अनिल कपूर म्हणतोय मै फिर से उड चला

एकवेळ जगात सगळं काही वाढेल पण अभिनेता अनिल कपूरचे वय काही वाढणार नाही… अरे अनिल कपूर तू काय तुझे वय फ्रिझ करून ठेवलं आहेस का? सोनम कपूर एकेदिवशी आजी होईल पण तिचा बाबा अनिल कपूर तेव्हाही तरुणच दिसेल अशा कॉम्प्लिमेंट एव्हरग्रीन अनिल कपूरला नेहमीच मिळतात. आणि हे खरंही आहे की अनिलने साठी ओलांडली तरी अजूनही तो चाळीशीपार नसल्यासारखा दिसतो. अर्थातच यावर अनिलने त्याच्या डाएट आणि फिटनेसबाबत घेतलेली मेहनत आहे. पण सध्या मात्र अनिल जर्मनीत एका आजारावर उपचार घेत असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. अनिलने स्वतःच त्याच्या सोशलमीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. हॉस्पिटलमधल्या पेशंटलूक मधला फोटोही त्याने शेअर केल्याने त्याचे चाहते काळजीत पडले आहेत.

गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे ऍचिलीस टेंडिनाइटिसने या आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं होतं. कोणतीही सर्जरी न करता त्यांनी या आजारावर मात केली होती. आता पुन्हा अनिल कपूर याच आजारावर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेले असावेत, असं काहींनी म्हटलं आहे. जर्मनीच्या रस्त्यावर फिरत असतानाचा एक व्हिडिओही अनिलने शेअर केला असून यामध्ये रॉकस्टार सिनेमातील ‘मै फिर से उड चला’ हे गाणही वाजत आहे. आज माझा जर्मनील उपचाराचा शेवटचा दिवस अशी कॅप्शनही अनिलने दिली आहे. ट्रिटमेंट यशस्वी झाल्याने अनिल तर चांगलाखुश आहे.

Advertisements

Related Stories

संगीतकार अनु मलिक यांच्या आईचे निधन

Rohan_P

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला

Patil_p

दीपिका पादुकोणने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

Abhijeet Shinde

अखेरीस रामायण मालिका मराठीत पाहण्याची संधी

Patil_p

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ

prashant_c

‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर

Patil_p
error: Content is protected !!