तरुण भारत

सोनाक्षीही होणार दुसरी पत्नी

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक बॉलिवूड कपल्स डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या तयारीत आहेत. पण बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अनेक अभिनेत्रींनी लग्न करताना दुसरी पत्नी होण्यातच जास्त आनंद मानला आहे. यामध्ये हेमामालिनी, श्रीदेवी यांनीही ज्यांच्याशी लग्न केले त्यांचा आधी घटस्फोट झाला होता. तर त्यांच्यानंतरच्या पिढीतील करिश्मा कपूर, करीना कपूर, शिल्पा शेट्टी यांनीही हीच परंपरा कायम ठेवली. ऑनक्रिन चुलबुल पांडे यांची बायको झालेली आणि खामोश फेम शत्रुघ्न सिन्हांच्या लाडक्या लेकीलाही लग्नाचे वेध लागले आहेत. दबंग गर्ल सोनाक्षी लवकरच लग्न करणार असून नुकतीच तिने सोशलमीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सोनाक्षीनेही आधीच लग्न झालेल्या घटस्फोटीत मुलाची निवड साथीदार म्हणून करत बॉलिवूडची लग्न परंपरा जपली आहे. सिनेमाइंडस्ट्रीतील खान कुटुंबातील नातेवाईकांच्या घरात सोनाक्षी सून म्हणून जाणार आहे. सलमान खानचा धाकटा भाऊ अभिनेता सोहेल खान याचा मेहुणा बंटी सचदेवाच्या गळय़ात सोनाक्षी हार घालणार आहे. सोनाक्षीचे जरी हे पहिले लग्न असले तरी बंटीची मात्र सोनाक्षी दुसरी बायको असेल. स्पोर्टस्सेलिब्रिटी बंटीचे पहिले लग्न गोव्याच्या अंबिकाशी झाले होते मात्र त्यांचा घटस्फोट झाला आहे. चार वर्षापासून सोनाक्षी आणि बंटी एकमेकांना डेट करत आहेत. सोनाक्षीचा सध्या कोणताही सिनेमा फ्लोअरवर नाही तर दबंगनंतर तिने हिट सिनेमाही दिलेला नाही. आता लग्नानंतर सोनाक्षी अभिनयक्षेत्रात करिअर सुरू ठेवणार की गृहिणी होणार असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Related Stories

‘पुष्पा’ने 3 दिवसात कमाविले 173 कोटी

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे निधन

Rohan_P

सुशांत आत्महत्या : एम्स हॉस्पिटलकडून सीबीआयकडे अहवाल सुपूर्त

Rohan_P

तापसी पन्नूचा ‘मिशान इम्पॉसिबल’

Patil_p

तेजस्विनी बनली रक्तदाती

Patil_p

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

Rohan_P
error: Content is protected !!