तरुण भारत

शिरोली ग्रामपंचायतीची ‘क’ वर्ग नगरपालिका मागणीसाठी ठराव मंजूर

पुलाची शिरोली / वार्ताहर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्द वाढीत समाविष्ट करण्यास शिरोली ग्रामपंचायतीचा विरोध असून प्रसंगी शिरोलीसाठी ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करण्यास भाग पाडू असा ठराव ग्रामपंचायतीच्या सभेत करण्यात आला. शिरोली ग्रामपंचायतीचे विरोधी गटनेते शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे यांनी केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते.

या सभेत कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीवरून जोरदार चर्चा झाली. या चर्चेत शिरोली औद्योगिक वसाहत मिळून क वर्ग नगरपरिषदेची गेली पंचवीस वर्षापासून मागणी सुरू आहे. त्यातून २०१६ मध्ये बेमुदत गाव बंद करून पुणे बेंगलोर महामार्ग रोखून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही लोकप्रतिनिधींनी ‘क’ वर्ग नगर परिषद करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु शिरोलीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न तर ग्रामपंचायतीचा हद्द वाढीस झालेला विरोध यातून तत्कालीन युती शासनाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या ग्रामपंचायतीला प्राधिकरणामध्ये समाविष्ट केले आहे. त्यातून प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास झालेला नाही .त्यामुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास न होता केवळ महसूल डोळ्यासमोर ठेवून हद्दवाढीचा सुरू झालेला प्रयत्न हाणून पाडण्याचा ठराव सदस्य सलीम महात यांनी केला. यावेळी उपसरपंच सुरेश यादव, ग्रा. पं .सदस्य अनिता कांबळे, संध्याराणी कुरणे, पुष्पा पाटील,संग्राम कदम, ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. भोगन सर्व सदस्य उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : केंद्र शासनाने सॉफ्टलोनऐवजी ऊसाला प्रतिटन ५०० ते ६०० रु. अनुदान द्यावे

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन

Abhijeet Shinde

लंगडी बाजू सावरण्यासाठीच राजू शेट्टींचा प्रयत्न : नाराजी ऐवजी शुद्धीकरण महत्वाचे

Abhijeet Shinde

इंग्लंडच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमधील तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचीच

Abhijeet Shinde

भारतीय कोरोना लस सुरक्षित – संजयबाबा घाटगे

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून कोव्हिशिल्ड’चा बुस्टर डोस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!