तरुण भारत

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटनेत 15 जण ठार

शववाहिका ट्रकला धडकली

वृत्तसंस्था / नदिया

Advertisements

पश्चिम बंगालच्या नदियामध्ये भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी धाव घेतलेले पोलीस आणि अन्य लोकांनी मिळून मदतकार्य केले आहे. एक मृतदेह घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे.

उत्तर 24 परगणा येथील बगदा येथून मृतदेह नवदीप स्मशानभूमीच्या दिशेने नेण्यात येत होता. शववाहिकेतून 20 हून अधिक जण प्रवास करत होते. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव शववाहिकेने ठोकर दिली. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

ट्रक आणि शववाहिकेच्या धडकेची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य हाती घेण्यात आले. शववाहिकेतून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर अन्य जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

आंतरजिल्हा प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही

Patil_p

आफ्रिकन व्हेरिएंटपासून भारत सुरक्षित

Patil_p

शेतकरी नेत्या’कडून नव्या पक्षाची घोषणा

Patil_p

भारतासाठीच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचे उत्पादन सुरू

Patil_p

कर्नाटकात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

Abhijeet Shinde

सुवर्णमंदिरात खलिस्तानी घोषणा, वादग्रस्त व्यक्तींची हजेरी

Patil_p
error: Content is protected !!