तरुण भारत

चीनच्या हालचालींवर भारताकडून चिंता व्यक्त

पूर्व लडाख क्षेत्रात नवे रस्ते अन् तळांची निर्मिती

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावादरम्यान चीनच्या हालचालींनी पुन्हा एकदा भारताच्या चिंता वाढविल्या आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख सेक्टरमध्ये निर्मितीकार्य केल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन सातत्याने स्वतःच्या सैन्यसामर्थ्यात भर घालत आहे. मागील हिवाळय़ाच्या तुलनेत शेजारी देश वास्तव्यसुविधा, रस्तेसंपर्क समवेत अनेक प्रकरणांमध्ये चांगल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलीकडेच दोन्ही देशांदरम्यान झालेल्या चर्चेत भारताने पूर्व लडाख सेक्टरमधील निर्मितीकार्यावर चिंता व्यक्त केली होती. चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक नवे महामार्ग आणि संपर्क रस्ते, नवे तळ तयार करत असून यामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच चीनने मोठय़ा प्रमाणात क्षेपणास्त्रांसह अनेक शस्त्रास्त्रांनाही तैनात केले आहे.

काशगर, गार गुंसा आणि होतानमध्ये स्वतःच्या मुख्य तळांव्यक्तिरिक्त महामार्गांचे रुंदीकरण आणि नव्या धावपट्टय़ा चीन तयार करत आहे. सीमावर्ती क्षेत्रातील होणारा हा भारतासाठी धोक्याचा इशारा आहे. चीन अंतर्गत भागांसमवेत अमेरिका तसेच अन्य उपग्रहांपासून वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतःचे वायुदल आणि सैन्यासाठी विशेष तयारी करतोय. पीएलएच्या नियंत्रणाखालील तिबेट स्वायत्त क्षेत्रात रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रs तैनात करण्यात आली आहेत. तसेच चीनने क्षेत्रात टेहळणीसाठी मोठय़ा प्रमाणात ड्रोन आणले आहेत.

भारताकडूनही तयारी

मागील वर्षाच्या तुलनेत भारताची तयारी देखील मजबूत आहे. तसेच भारताने क्षेत्रातील अडचणींना तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टींना तैनात केले आहे. भारताने सशस्त्र दलांना उंचीवरील सीमाक्षेत्रांमध्ये पाठविले असून तेथे हिमवाळवंटात तोफा तैनात केल्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान सीमेवरून तणाव सुरू आहे. पूर्ण पूर्व लडाख क्षेत्रात सुरक्षा दल मोठय़ा संख्येत आहे. याचबरोबर हवामानाशी संबंधित अवघड स्थितीला तोंड देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. पुढील 6 महिन्यांसाठी रसद जमा करण्यासाठी भारतीय वायुदल सातत्याने काम करतेय.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये जनऔषध केंद्रांतून 52 कोटींची विक्री

Patil_p

कोकरुड व जतच्या ग्रामीण रुग्णालयात, आयसोलेशन वार्ड करणार – पालकमंत्री

Abhijeet Shinde

फुटीर नगरसेवकांचे कारनामे उघड करणार- विजय भिके

Patil_p

संजय हॉल येथे ५० बेडचे स्वतंत्र कोविड केंद्र सुरू करा

Abhijeet Shinde

तन्मयता व नम्रता नसेल, तर विद्वत्ता फुकट आहे

Rohan_P

सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 20 कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!