तरुण भारत

कामावर हजर झालेले चालक-वाहक पुन्हा आंदोलनात

वार्ताहर/ कराड

कराड आगारातील एक चालक व वाहक शनिवारी कामावर हजर झाल्याने 20 दिवसानंतर कराड आगारातुन एक एस. टी. बाहेर पडली होती. मात्र एकच दिवस कामावर हजर झालेले चालक व वाहक रविवारपासून पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्याने रविवारी दिवसभरात एकही एस. टी. ची फेरी झाली नाही. एस. टी. प्रशासनाने कारवाईचे शस्त्र उपसले असले तरी कर्मचारी आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱयांनी व्यक्त केला आहे.

Advertisements

एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर एस. टी. कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू आहे. कराड आगारातील एस. टी. कर्मचाऱयांनीही बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात जवळपास 21 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आगारातील सर्वच चालक व वाहक सहभागी झाल्याने कराड आगाराची एस. टी. सेवा ठप्प झाली आहे. दरम्यान दोन दिवसांपासून एस. टी. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांत कराड आगारातील रोजंदारीवर काम करणाऱया चार कर्मचाऱयांची सेवा समाप्ती व 12 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान शनिवारी सकाळी एक चालक व वाहक कामावर हजर झाल्याने कराड-स्वारगेर-कराड अशी एक फेरी झाली, मात्र शनिवारी कामावर हजर झालेले दोन्ही कर्मचारी रविवारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे रविवारी दिवसभरात एकही एस. टी. ची फेरी होऊ शकली नाही. कोल्हापूर व सांगली विभागाच्या मात्र काही प्रमाणात फेऱया सुरू आहेत.

 चालक-वाहक वगळता प्रशासन व वर्कशॉप विभागातील बहुतांश कर्मचारी कामावर येत आहेत. दोन्ही विभागातील मिळून रविवारी एकुण 96 कर्मचारी कामावर हजर असल्याचे आगार प्रमुख विजय मोरे यांनी सांगितले. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱयांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

20 महिन्यानंतर…स्कूल चले हम..!

datta jadhav

सातारा : नियम न पाळल्यास कारवाईचे अधिकार – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

साताऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा 14 जणांना चावा

datta jadhav

जी.एस.टी. परताव्याची राज्यांना गरज : खा. श्रीनिवास पाटील

Patil_p

सातारा : महामार्गावर कोसळले वटवृक्ष

datta jadhav

जिह्यात घटस्थापनेपासून सर्व धार्मिक स्थळे सुरु होणार

Patil_p
error: Content is protected !!