तरुण भारत

संपकरी एसटी कर्मचाऱयांवर एकाच दिवशी मोठी कारवाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटेचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी संपावर गेलेल्या जिह्यातील एसटी कर्मचाऱयांवर शनिवारी उशिरा मोठी कारवाई करण्यात आल़ी यामध्ये तब्बल 193 एसटी कर्मचाऱयांची सेवासमाप्ती तर 128 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल़ी दरम्यान संपाला तब्बल 1 महिना पूर्ण होत असतानाही एसटी कर्मचाऱयांचा संप कायम असल्याचे दिसत आह़े दरम्यान शनिवारी रात्री खेड-दापोली गाडी दापोलीकडे येत असताना अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दापोली पोलिसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

  संप सुरू असतानाच रविवारी आणखी 25 कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ यामुळे हजर कर्मचाऱयांची संख्या 425 इतकी झाली आह़े यामध्ये टीआरपी वर्कशॉप येथील 66 कर्मचाऱयांचा समावेश आह़े रविवारी गुहागर, खेड, चिपळूण, राजापूर, लांजा, देवरूख आगारातून गाडय़ा सोडण्यात आल्य़ा असे असले तरी रत्नागिरी व मंडणगड येथून गाडय़ा सोडण्यात अडचणी निर्माण होत आहेत़ रविवारचा विचार करता 100 हून अधिक एसटीच्या फेऱया चालविण्यात आल्य़ा

  सुरूवातीला महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे मिळावा, यासाठी 28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर गेले होत़े यावेळी 17 टक्क्यांवरून 27 टक्के महागाई भत्ता करण्यात आल्यानंतर एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेल़े यामुळे एसटी कर्मचाऱयांच्या संपाला आता 1 महिना रविवारी पूर्ण झाल़ा यामध्ये दिवाळीच्या दिवसांचाही समावेश होत़ा तसेच दरदिवशी 70 लाख रूपये उत्पन्न असलेल्या एसटीला महिन्याभरात सुमारे 21 कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आह़े

दापोलीतून लांब पल्ल्याच्या गाडय़ांना ब्रेक

दापोलीः संपातून काही कर्मचाऱयांनी माघार घेतल्यामुळे दापोली आगारातून बसफेऱया सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु संप अद्याप मिटलेला नसल्यामुळे व अनेक कर्मचारी अद्याप संपात असल्याने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना सध्या ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागांमध्ये गावागावात एक ते दोन फेऱया सुरू करण्यात आल्याचे दापोली आगाराकडून सांगण्यात आले.

   दापोलीतून खेड तर एक चिपळूण अशी बस सुरू आहे. उर्वरित गाडय़ा ग्रामीण भागांमध्ये धावत आहेत. रत्नागिरी येथे सुरू करण्यात आलेली गाडी एक दिवसच धावली, परंतु त्यानंतर ही बस बंद करण्यात आल्याचे दापोली आगारातील चौकशी विभागातून सांगण्यात आले. शुक्रवारी राज्य परिवहनचे काही कर्मचारी संपातून माघार घेऊन डय़ुटीवर हजर झाले. त्यामुळे दापोली आगारातून ग्रामीण भागात गाडय़ा सोडण्यात आल्या. सध्या दापोली आगारामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  शुक्रवारी गाडय़ा सुरू झाल्यानंतर प्रवाशांमधून आनंद व्यक्त करण्यात आला, परंतु अद्याप सर्वच कर्मचारी रूजू झालेले नसल्यामुळे जसजसे कर्मचारी दाखल होत आहेत तसतशा गाडय़ा ग्रामीण भागांमध्ये सोडल्या जात आहेत. मात्र सध्या कर्मचारी पुरेसे नसल्यामुळे गाडय़ांचे नियोजन करताना अडचण निर्माण होत आहेत. तसेच अजून संपात मोठय़ा प्रमाणात कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे अनेक आगारांमध्ये अद्याप संप मिटलेला नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे नियोजन न करता पुरेपूर गाडय़ा ग्रामीण भागांमध्ये सोडल्या जात आहेत.

                  दगडफेक करणाऱया अज्ञातावर गुन्हा दाखल

शनिवारी रात्री खेड-दापोली गाडी दापोलीकडे येत होती. मात्र ही गाडी वाकवली, नवानगरच्या मध्ये आली असता अचानक दगडफेक झाली. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले. परंतु दगड मारणाऱयाचा अंदाज चुकल्याने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. या गाडीचा दापोली आगारात पंचनामा करण्यात आला असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेक करणाऱया अज्ञात व्यक्तीचा तपास पोलीस घेत आहेत.

Related Stories

“एमटीडीसी”च्या कामांची चौकशी करा- संजू परब यांची किरीट सोमय्यांकडे मागणी

Ganeshprasad Gogate

बांदा सोसायटी हॉल बांधकामसाठी ५ लाखाची देणगी

NIKHIL_N

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

चिपळुणात देशी-विदेशी दारुसाठा जप्त

Patil_p

95टक्के मच्छिमारी नौका किनाऱयावरच!

Patil_p

कोल्हापूर : केएमटीच्या बजेटमध्ये नाविन्यपूर्ण योजना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!