तरुण भारत

गांधी मार्केटच्या अंतर्गत भागातील रस्त्याचे डांबरीकरण मार्गी

नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी दिलेली माहिती

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मडगावच्या गांधी मार्केटच्या अंतर्गत भागातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे काम रविवारपासून हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती प्रभाग 14 च्या नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी दिली. यावेळी गांधी मार्केट तयार कपडे, फळभाजी विक्रेते संघटनेचे राजेंद्र आजगावकर उपस्थित होते.                                                           

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेऊन मे महिन्यात पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळय़ाला प्रारंभ झाल्याने सदर हॉटमिक्स डांबरीकरण काम पुढे ढकलणे भाग पडले होते. गांधी मार्केट प्रवेशद्वार, टी कॉर्नर ते गांधी मार्केटला वळसा घालून सांबारी बूक स्टोअरपर्यंतचा सदर रस्ता साफ वाहून गेला आहे. काही वर्षापूर्वी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी नारळ वाढविला होता. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरूच झाले नव्हते, असा दावा आजगावकर यांनी केला.

गांधी मार्केट संघटनेचे सर्वेसर्वा असलेले बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री असल्याने संघटनेने त्यांच्या नजरेस हा विषय आणून दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी साबांखाचे कार्यकारी अभियंता पाणंदीकर यांच्याकडे पाठपुरावा करून हे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम मंजूर करून घेतले, असे सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी पाठपुरावा करून हॉटमिक्स डांबरीकरणास मंजुरी मिळविल्यामुळे त्यांचे संघटनेच्या वतीने तसेच नगरसेविका डॉ. आजगावकर यांनी आभार मानले आहेत.

Related Stories

कोरोनाचे भय अद्याप कायम – मुख्यमंत्री

Patil_p

सांखळी उपनगराध्यक्ष पदी कॉग्रेसचे राजेश सावळ

Omkar B

मुरगाव पालिका मंडळ सुस्त, मरगळ झटकण्याची लोकांना प्रतिक्षा, समस्यांमुळे लोकांमध्ये उबग

Amit Kulkarni

कातुर्ली, सोणये भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

Omkar B

कोविड हॉस्पिटलातून रुग्ण पळाला पण…

Patil_p

शेळ-मेळावली ग्रामस्थांचे दुसऱया दिवशीही आंदोलन सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!