तरुण भारत

जपानमध्ये विदेशींच्या प्रवेशावर बंदी

कॅनडा-फ्रान्समध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले – ब्रिटनमध्ये दिला जाणार बूस्टर डोस

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने पूर्ण जगालाच चिंतेत टाकले आहे. फ्रान्समध्ये ओमिक्रॉनचे 8 संशयास्पद रुग्ण मिळाले आहेत. कॅनडात नायजेरियामधून परतलेल्या दोन जणांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. वाढते रुग्ण पाहता अनेक देशांनी चाचण्या-आयसोलेशनमध्ये वेग आणण्याचा आदेश दिला आहे. तर ब्रिटन, श्रीलंका, मालदीव सह अनेक देशांनी आफ्रिकन देशांवर प्रवासबंदी लागू केली आहे. तर जपानने ओमिक्रॉन संकट पाहता सर्व विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट पाहता ब्रिटनमध्ये कठोर धोरण अंमलात आणलेगेले आहे. तेथे प्रवासबंदी, फेसमास्क आणि चाचण्यांप्रकरणी शिथिलता न बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. देशात आता 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. तर यापूर्वी हा डोस केवळ 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना देण्यात येत होता. बूस्टर डोसचे लसीकरण गतिमान करण्यासाठी दुसऱया आणि तिसऱया डोसमधील अंतरही कमी केले जाऊ शकते. हा कालावधी सध्या 6 महिने असून तो 5 महिन्यांवर आणला जाऊ शकतो.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1.8 कोटी लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. ब्रिटिश प्रयोगशाळांमध्ये दक्षिण आफ्रिकन व्हेरियंटच्या 75 संभाव्य नमुन्यांची चाचणी केली जात असल्याने सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात आतापर्यंत 3 रुग्णांची पुष्टी झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करण्यात येतेय.

फ्रान्समध्ये संशयित रुग्ण

फ्रान्समध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 8 संशयास्पद रुग्ण मिळाले आहेत. काही प्रवासी मागील 14 दिवसांमध्ये आफ्रिकेतून परतले आहेत, यापैकी 8 जणांमध्ये ओमिक्रॉन संक्रमण झाले असण्याचा संशय आहे. या सर्व रुग्णांमधील कोरोना विषाणूच्या स्क्रीनिंगमध्ये अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरियंटचे म्युटेशन्स आढळलेले नाहीत. आता सीक्वेंसिंगद्वारे पुढील माहिती मिळविली जाईल असे फ्रान्सच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कॅनडातही संशयित रुग्ण

कॅनडात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. ऑन्टोरियोमध्ये हे रुग्ण आढळले असून ते नायजेरियातून परतले होते. ओटावा पब्लिक हेल्थ याप्रकरणी तपास करत असून दोन्ही रुग्ण आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. कॅनडामध्ये आता विदेशातून येणाऱया प्रवाशांना विमानतळावर चाचणी करवून घ्यावी लागणार आहे.

अमेरिकेकडून बंदीची तयारी

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बचावासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे. अमेरिकेने आफ्रिकन देशांवर प्रवासबंदी लादण्याची तयारी केली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट मोनोक्लोनल अँटीबॉडीजला बायपास करू शकतो आणि यामुळे तो किंचित घातक ठरू शकतो असे प्राथमिक माहितीनुसार म्हणता येईल असे अमेरिकेच्या अध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फॉसी यांनी म्हटले.

Related Stories

चिंताजनक : पंजाबमधील कोरोना रुग्णांची संख्या 60 हजार पार

Rohan_P

किरकोळ महागाई दरात घट

Patil_p

फायझर इंडियाकडून लस वापरासाठी DCGI कडे अर्ज

datta jadhav

पंजाबमध्ये 614 नवे कोरोना रुग्ण; 22 मृत्यू

Rohan_P

विदेश दौऱयावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार

Patil_p

‘सोमनाथ’मधील अतिथीगृह भाविकांच्या सेवेत दाखल

Patil_p
error: Content is protected !!