तरुण भारत

चीनच्या 27 लढाऊ विमानांनी पुन्हा ओलांडली सीमा

संतप्त तैवानने पाठविले ‘विध्वंसक’

वृत्तसंस्था/ तैपैई

Advertisements

चीनच्या 27 लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा तैवानच्या हवाईक्षेत्रात घुसखोरी केली आहे. या प्रकारानंतर संतप्त तैवानने या घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी स्वतःच्या लढाऊ विमानांना पाठविले. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारीच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ जनरल्ससोबत चर्चा केली होती. चिनी लढाऊ विमानांच्या घुसखोरीला तैवानच्या उपसागरात वाढत्या तणावाशी जोडून पाहिले जातेय.

चीनच्या 27 विमानांनी आमच्या एअर डिफेन्स बफर झोनमध्ये प्रवेश केला. चीनच्या या कृत्याला प्रत्युत्तर देत आमच्या लढाऊ विमानांनी त्यांना पिटाळून लावले. हवाई क्षेत्रात प्रवेश करणाऱयांमध्म्ये 18 लढाऊ विमाने, 5 एज-6 बॉम्बवषंक विमान आणि इंधन भरणारे वाय-20 सामील होते असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

चिनी विमानांनी तैवानच्या दक्षिण भागानजीक त्याच्या हवाई सुरक्षा क्षेत्रात प्रवेश केला आणि चीनमध्ये परतण्यापूर्वी प्रशांत महासागरात उड्डाण केले. यादरम्यान या विमानांनी तैवानच्या दक्षिणेतील बाशी सामुद्रधुनीतून उड्डाण केले. ही सामुद्रधुनी तैवानला फिलिपाईन्सपासून वेगळे करते.

Related Stories

थानवी अमेरिकेतील सर्वात कमी वयाची लेखिका

Patil_p

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.85 लाख बळी

datta jadhav

आशिया खंड : फुफ्फुसाचा कर्करोग महिलात 25 टक्के तर पुरुषात 24 टक्क्यांनी वाढला

Sumit Tambekar

बायडेन तीन माजी अध्यक्षांसह घेणार ऑन कॅमेरा कोरोना लस

datta jadhav

स्वीडन पंतप्रधानपदी मॅग्डेलेना अँडरसन

Patil_p
error: Content is protected !!