तरुण भारत

तृणमूल खासदार अर्पिता घोष यांचा राजीनामा मंजूर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी वरिष्ठ सभागृहाला दिली आहे.  

Advertisements

दिवंगत सदस्यांच्या सन्मानार्थ एक तासासाठी राज्यसभेचे कामकाज स्थगित केल्यावर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभापती नायडू यांनी अर्पिता घोष यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती दिली. वरिष्ठ सभागृहात पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱया अर्पिता यांनी 15 सप्टेंबर रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अर्पिता यांचा राजीनामा त्याचदिवशी स्वीकारण्यात आला होता असे नायडू यांनी सांगितले. अर्पिता यांना मार्च 2020 मध्ये तृणमूल काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले होते. तत्पूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या बेलूरघाट मतदारसंघात पराभूत झाल्या होत्या.

Related Stories

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

भाताच्या आधारभूत दरात वाढ

Patil_p

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री रोसैया कालवश

Patil_p

काँग्रेस-राजद युतीचा बिहारमध्ये ‘काडीमोड’

Patil_p

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची चिन्हे

Patil_p

अधिक शुल्क घेणाऱया केबल कंपन्यांविरोधात कारवाई होणार

Patil_p
error: Content is protected !!