तरुण भारत

ब्रिटनमध्ये अर्विन वादळाचा कहर

160 किलोमीटर वेगाने वाहिले वारे- 2.5 लाख घरांचा वीजपुरवठा ठप्प

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisements

ब्रिटनमध्ये आलेल्या अर्विन या हिमवादळाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. या वादळामुळे 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहिले आहेत. वादळामुळे 5 हजारांहून अधिक वृक्ष कोसळले आहेत. तसेच वीजेच्या तारा कोसळल्याने 2.5 लाख घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. वादळापोटी झालेल्या दुर्घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू ओढवला आहे.

यातील एक दुर्घटना उत्तर आयर्लंडमध्ये घडली असून तेथे कारवर झाड कोसळल्याने एका प्राचार्याला जीव गमवावा लागला. तर एक अन्य व्यक्ती कुम्ब्रियामध्ये झाड कोसळून ठार झाला. तिसरी घटना एबर्डीनशायर येथे घडली असून तेथेही कारवर झाड कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला.

हिमवृष्टीमुळे पारा शून्याखाली पोहोचला आहे. हवामान विभागाने स्थिती पाहता इंग्लंड, वेल्स आणि आयर्लंडमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. लोकांना घरांमध्ये राहण्याचा आणि ड्रायव्हिंग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोसळलेल्या झाडांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

Related Stories

निर्बंध शिथील होणार

Patil_p

मायनिंग सिटी किरुनाची व्यथा

Patil_p

अंतराळ पर्यटनाला प्रारंभ

Amit Kulkarni

जपानच्या तळावरून युएईची ‘मंगळ’झेप

Patil_p

जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा इशारा

Patil_p

अमेरिकेत 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!