तरुण भारत

सांगलीत संपाचा जोर; एसटी कर्मचारी संभ्रमात

पुन्हा काही कर्मचारी आंदोलनात परतले: कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या व गाड्यांच्या फेऱ्या झाल्या कमी: निलंबनाचे सत्र सुरुच

सांगली/प्रतिनिधी

Advertisements

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील अनेक एसटी आगारांमध्ये कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले होते. जिल्ह्यातील काही आगारात कामावर परतलेल्या या कर्मचाऱ्यांकरवी गेल्या चार दिवसात दररोज ३०० च्या आसापास गाड्या बाहेर पडत होत्या. या गाड्यांच्या विविध मार्गावरील फेऱ्याही वाढवण्यात आल्या होत्या. परंतू सोमवारपासून सांगलीत संपाची तीव्रता पुन्हा जोर धरु लागली आहे. काही राजकीय पुढारी व कामगार संघटनेतील नेत्यांच्या आवाहनामुळे जिल्ह्यातील काही संपकरी पुन्हा संपात सामील झाले आहेत. त्यामुळे संप मागे घेण्याबाबत एकमत होत नसल्याने कामावर असणारे इतर कर्मचारी अजूनही संभ्रमात आहेत. कामगारांच्या आडमुठेपणामुळे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, नवे 186 रूग्ण

Abhijeet Shinde

राज्यातील 12 हजार बंदीजन कोरोना पॅरोल रजेवर

Abhijeet Shinde

सांगली : सिंगल फेज, बंद ट्रान्सफार्मरने शेतीचे नुकसान, महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांतुन संताप

Abhijeet Shinde

रंगभूमी दिन उत्साहात साजरा

Abhijeet Shinde

सागरेश्वर अभयारण्याची ऊच्चस्तरीय समितीकडुन चौकशी – आ.अरुण लाड

Sumit Tambekar

सांगली : ‘त्या’ आदिवासी महिलेचा खून पतीनेच केल्याचा संशय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!