तरुण भारत

सुव्ह डिझाईनमध्ये मारुतीची येणार नवी स्विफ्ट

25 लाखाच्यावर स्विफ्टचा खप – नव्या गाडीबाबत उत्सुकता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी येणाऱया काळामध्ये सुव्हच्या डिझाईनप्रमाणे नवी स्विफ्ट गाडी सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ग्राहकांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. सदरची गाडी कधी सादर केली जाणार याबाबत कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मारूती सुझुकीच्या स्विफ्ट गाडीला मोठा ग्राहकवर्ग आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत 25 लाख स्विफ्ट गाडय़ांची यशस्वीपणे विक्री करण्यात आली आहे. 2014 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये स्विफ्ट गाडी ‘कॉन्सेप्ट एस’ नावाने सादर करण्यात आली होती. सदरच्या लाँचिंगनंतर स्विफ्टच्या मागणीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ दिसली. त्यावेळच्या लाँचिंगनंतर आतापर्यंत स्विफ्टच्या दिसण्यामध्ये खूप मोठे बदल दिसून आले आहेत. सुझुकी स्विफ्टच्या तिसऱया जनरेशन मॉडेलने 4 वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या गाडीची सुधारित आवृत्ती नव्या डिझाईनसह सादर करण्यात आली होती.

नव्या डिझाइनमध्ये येणार गाडी

येणाऱया काळामध्ये कंपनी नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट ही गाडी नव्याने सादर करणार आहे. जिचे डिझाईन सुव्ह प्रकारातील गाडीप्रमाणे असणार आहे. या गाडीला 48 व्ही माईल्ड हायब्रीड सिस्टिमसह 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. 200 एमएमपेक्षा जास्त ग्राऊंड क्लिअरन्स असणार आहे. मागच्या रांगेमध्ये बसणाऱया प्रवाशांना नव्या गाडीमध्ये जादा जागा असणार आहे, असेही सांगितले जात आहे. हार्टेक्ट प्लॅटफॉर्ममध्ये स्विफ्ट गाडीचे डिझाइन तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच येणारी नवी गाडी साधारण इग्निस कारप्रमाणे दिसते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Stories

वोल्वो कारची किरकोळ विक्री 2021 मध्ये 27 टक्के वाढली

Patil_p

बजाजची नवी प्लॅटिना 100 लाँच

Patil_p

फोक्सवॅगनने वाढवल्या किंमती

Amit Kulkarni

बजाज ऑटोचा निर्यातीवर भर

Patil_p

टोयोटा किर्लोस्करच्या कार विक्रीत 12 टक्के वाढ

Patil_p

टीव्हीएसकडून एनटॉर्कच्या 1 लाख गाडय़ा निर्यात

Patil_p
error: Content is protected !!