तरुण भारत

जियोचे दर डिसेंबरपासून वाढणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी रिलायन्स जियोने आपले दर 1 डिसेंबरपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भारती एअरटेलने कॉल-इंटरनेट दरात वाढ लागू केली आहे.

Advertisements

मागच्या आठवडय़ात व्होडाफोन आयडियाने दरात वाढ केली होती. जियोने 1 डिसेंबरपासून दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून नव्या योजना ग्राहकांकरिता आणल्या असल्याचे समजते. कमी किमतीत उत्तम सेवा देण्यासाठी यापुढेही कंपनी सज्ज असणार आहे. दरम्यान 75 रुपये ते 2399 रुपयांपर्यंतच्या जुन्या शुल्क दरात 20 टक्के आता वाढ केली जाणार आहे. दुसरीकडे एअरटेल व व्हीआय यांनी आपल्या दरात 25 टक्के वाढ केली आहे. तर रिलायन्सने वरील शुल्क प्रकारात सरासरी 21 टक्के वाढ केली आहे.

नवे कॉल-इंटरनेट दर

कंपनी               जुना दर नवा दर

भारती एअरटेल. 79……. 99

व्होडाफोन आयडिया…… 79         99

रिलायन्स जियो   75        91

Related Stories

इलेक्ट्रीक वाहनांसाठी हय़ुंडाईची योजना तयार

Patil_p

बर्जर पेंटस्ने किमती वाढवल्या

Patil_p

चहाची किंमत 60 टक्क्मयांनी वाढली

Patil_p

सिंगापूरचा जीडीपी 41.02 टक्क्मयांनी घसरला

Patil_p

सिप्लाची कोरोना लढय़ास 25 कोटीची मदत

Patil_p

टाटा समूहाचा ई-कॉमर्सच्या मजबूतीसाठी प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!