तरुण भारत

शेअर बाजार किंचिंत वधारत बंद

सेन्सेक्समध्ये 153 अंकांची वाढ, टार्सन्स प्रोडक्ट नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

शेअर बाजारात सकाळी मोठय़ा घसरणीनंतर दुपारनंतर बाजार सावरलेला दिसला. दिवसअखेर सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक किंचित वधारासह बंद झाले. टार्सन्स प्रोडक्टचा समभाग सर्वाधिक नुकसानीत होता.

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 153 अंकांच्या वाढीसह 57,260 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांच्या वाढीसह 17,053 अंकांवर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारात सकाळी मोठय़ा प्रमाणात घसरण दिसली होती. पण नंतर मात्र बाजाराने स्थिरावत पुन्हा तेजीच्या दिशेने पावले टाकली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स जवळपास 725 अंकांनी घसरून निर्देशांक 56,668 अंकांवर कार्यरत होता. पण नंतर परिस्थिती सुधारत सेन्सेक्सने पुन्हा तेजीकडे सरकत 255 अंकांच्या वाढीसह 57,363 अंकांचा टप्पा गाठला होता. बँकिंग आणि धातूसंबंधीत समभागांमध्ये घसरण दिसली होती.

मागच्याच आठवडय़ात लिस्ट झालेल्या टार्सन्स प्रोडक्टच्या समभागांनी तर 15 टक्के इतकी घसरण नोंदवली होती. खरंतर हा समभाग सकाळच्या सत्रात 10 टक्के चढलेला होता. पण काही तासातच या समभागात मोठी घसरण दिसली. तर हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेट व आयआरसीटीसीचे समभागही प्रत्येकी 5 टक्के इतके नुकसानीत होते.

बाजार भांडवलात मोठी घट

लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र 253 लाख कोटी रुपये इतके राहिले होते. पहिल्या काही मिनीटातच यात 5 लाख कोटींची घट दिसली. सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 79 अंकाच्या घसरणीसह 57,028 अंकांवर खुला झाला होता. पण पहिल्याच मिनीटात यात 500 अंकांची घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एसबीआयचा समभाग 3 टक्के इतका घटला होता. रिझर्व्ह बँकेने सदरच्या बँकेवर नुकताच दंड ठोठावला होता. तर एचडीएफसीचा समभाग 2 टक्के घटला होता. दुसरीकडे टाटा स्टील, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, मारुती यांचे समभाग 2 ते 3 टक्के इतके घटले होते. ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा यांचे समभागही घसरणीतच होते.

सेन्सेक्समध्ये 30 पैकी 13 समभाग तेजीसह बंद झाले. निफ्टीतील 46 समभाग दुपारच्या सत्रात घसरणीत होते. निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांक 2.23 टक्के, निफ्टी बँक आणि निफ्टी वित्त निर्देशांक 1-1 टक्के इतके घसरणीत दिसले. ओएनजीसी, अदानी पोर्ट, हिरो मोटोकॉर्प व इंडियन ऑइल यांचे समभाग घसरणीत होते.  

Related Stories

होंडाची ऑनलाईन बुकिंगची योजना

Patil_p

इलेक्ट्रिक स्कूटर बनविणार रोबोट

Patil_p

टोयोटा उत्पादनात करणार घट

Patil_p

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स घसरणीत

Patil_p

डिजिटल जाहीराती वाढल्या

Patil_p

सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण

tarunbharat
error: Content is protected !!