तरुण भारत

ऊस रसाची (सायरप) बाजारपेठ

कालानुक्रमे ऊस आणि साखर धंद्यामध्ये खूपच विविधता येत आहे. उसापासून गूळ बनविण्याची प्रक्रिया ही पुरातन काळापासूनची कारखानदारी खाद्य वस्तू आहे. उसाचा रस आणि गूळ या मधली वस्तू म्हणजे काकवी. ही सुद्धा खूप जुनी पुरातन खाद्य वस्तू आहे. त्यानंतर पांढरी शुभ्र साखर तयार होऊ लागली. बारीक आणि मोठी साखर, खडीसाखर, साखरेचे गोळे अथवा क्मयुब, कच्ची साखर, ब्राऊन शुगर (ड्रग नव्हे) असे अनेक प्रकार ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादित केले जातात. या सर्व वस्तू उत्पादनाचे स्वरुप घरगुती ते मोठी कारखानदारीपर्यंत अनेक प्रकारच्या क्षमतेने साखर तयार केली जाते. 1970 ते 2020 पर्यंतच्या काळात साखर ही एकमेव प्रमुख वस्तू होती.

आता अलीकडे साखरेबरोबर तयार होणाऱया उपफळावर (मळी आणि बगॅस) प्रक्रिया करून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मळीपासून दारू, रसायने, स्पिरीट, इथेनॉल, जैव इंधन, कार्बन, खते अशा अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. बगॅसपासून वीज तयार केली जाते. पेंटवॉशपासून मिथेन गॅस तयार होते. बगॅसपासून कागद तयार होतो, हार्डबोर्ड, कार्डबोर्ड पार्टिशन अशा अनेक वस्तू त्यापासून बनविता येतात. मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा केला जातो. सध्या इथेनॉल (ई-20) च्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रात सुमारे 2250 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यु. पी. मध्ये 1500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शुगरकेनला आता एनर्जी केन म्हणावयाची वेळ आली आहे.

Advertisements

उसाचा सिरप तयार करण्याची प्रक्रिया घरगुती अथवा सूक्ष्म उद्योजकता स्तरावर केंद्रित होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण उसाचे रस ते जाड ज्यूस (काकवी) पर्यंतचा टप्पा सिरपमध्ये मोडतो. उसाच्या (सेंद्रिय) रसाचे बाष्पीभवन करून उसाचे सिरप बनविले जाते. त्यामध्ये अनेक प्रकारची कमी-जास्त गोडी निर्माण होते. उसाचा रस उकळून जाड रस बनविले जातो. त्यातील टाकाऊ उपपदार्थ फेसाळते ते बाहेर काढून बारीक बुडबुडय़ाचा शुद्ध सिरप तयार होतो. ऊसरसाला 210 फॅरनहिट उष्णता देऊन तयार केले जाते. त्याच्या शेवटच्या टप्प्याला काकवी म्हणतात. त्यानंतर घन स्वरुपात रॉ शुगर, व्हाईट शुगर तयार होतात. पावडर गूळ आणि काकवीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऊस सिरपचा धंदा घरगुती स्वरुपाचा बनून त्याच्या निर्यात व्यवहाराला प्राधान्य मिळण्याची शक्मयता आहे. बेकिंग सोडा, लिंबू, देशी भेंडीच्या धाटीचा वापर केल्यास ऊस रसातील अशुद्ध घटक दूर होतात. याला गुऱहाळ प्रक्रिया म्हणतात. हे सर्व सेंद्रिय स्वरुपाचे असल्यास सेंद्रिय सिरप तयार होते. त्याची प्रक्रिया जागतिक प्रमाणिकरण पद्धतीने तयार करून ते सर्व अर्थानी हायजिनिक बनविल्यास त्याची मागणी वाढू शकते.

उसाच्या या सिरपचा उपयोग अनेक प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये केला जातो. अन्न उद्योगामध्ये नैसर्गिक स्वीटनर आणि फ्लेवरिंग एजंट म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. वॅफल्स, केक, पॅनकेक्स, ब्रेड रोल आणि प्रेंच टोस्ट यासारख्या विविध प्रकारच्या बेकरी उत्पादनामध्ये ऊस सिरप वापरले जाते. याच्या वापरामुळे आर्द्रता टिकवून ठेवण्यास आणि ताजेपणा लांबवण्यास मदत होते. त्यामुळे वस्तूंची सेल्फ लाईफ वाढते. याशिवाय गरम धान्य, आईस्क्रीम, सॉस, फळांचा रस, कॉर्न फ्रिटर्स, बेक्ड बीन्स, ताजे डोनट्स आणि बेक्ड सफरचंद अशा विविध प्रकारच्या अन्नपदार्थांच्या उत्पादनामध्ये स्वाद निर्माण करता येतो. त्यासाठी आयएसओ 9002 व 2008 आणि बीआरसी प्रमाणिकरण मिळते. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यामध्ये मोठी गुंतवणूक होत आहे.

आफ्रिका आणि मध्यपूर्व राष्ट्रांमध्ये (सुमारे 40 देशांमध्ये) ऊस सिरपला खूप मागणी आहे आणि ते सातत्याने वाढत आहे. जागतिक ऊस सिरपच्या बाजाराचे मूल्य 2019 पासून 2027 पर्यंत सातत्याने वाढत जाण्याचे संकेत अनेक संशोधकांनी दिलेले आहेत. त्यासंबंधीचा अहवाल नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेषतः उसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे रस व त्याची सिरप उत्पादने त्यासोबत बनविता येऊ शकतात. एक टन उसापासून 70 लिटर इथेनॉल निघते. अशा उत्पादनाला जो ऊस लागतो, त्याची किंमत साधारणतः 10 टक्के उताऱयाच्या उसाला रु. 2850 प्रति मेट्रिक टन असा आहे.

ऊस सिरपच्या निर्यातीच्या आकडेवारीनुसार सुमारे 19 निर्यात बंदरातून अथवा केंद्रातून (हवाई व एसईझेड) सिरपची निर्यात होते. त्यामध्ये इनवर्ट शुगर सिरप, आयुर्वेदिक औषधे, कॅरमललाईझड शुगर सिरप, नारी हेल्थ सिरप, तुळसी कफ सिरप, शुगर फ्री सिरप यांचा समावेश आहे. बरेचसे सिरपचे प्रकार घरगुती अथवा लघु उद्योगाच्या स्वरुपात संघटित केलेले आहेत. त्यामुळे शेतकरी गटांना विशेषतः ऊस उत्पादक गटांना शुगर सिरपचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. भविष्यकाळात साखरेऐवजी उसाच्या सिरपचा वापर पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः ओईसीडी राष्ट्रामध्ये सिरपला खूप मागणी आहे. दक्षिण आफ्रिका, युएई, नेपाळ, श्रीलंका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, केनिया, लॅटिन अमेरिकन देश या आदेशांमध्ये भारतीय सिरप व त्याच्या उत्पादनांची निर्यात होते. परदेशात सुमारे 400 हून अधिक खरेदीदार आहेत. भारतातून 350 च्या वर पुरवठादार आहेत. आयात-निर्यातीचे शिपमेंट सुमारे 3304 आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा खरेदीदार आणि चार पुरवठादार सिरप निर्यातीचा व्यवसाय करतात. यामध्ये 79 जहाजांचा वापर होतो आणि 23600 मेट्रिक टन सिरपची अथवा सिरप संबंधित उत्पादनांची निर्यात होते.

याबाबतीत आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. म्हणजे त्या आधारावर सिरपच्या संबंधित धोरणांची उद्घोषणा करता येईल. हे लवकरच करणे फायदेशीर ठरणार आहे.

– डॉ. वसंतराव जुगळे

Related Stories

प्राप्तीकरचा चालू वित्त वर्षात करदात्यांना परतावा

Patil_p

‘टोल’ धाड संपणार का?

Patil_p

यंदा लसीकरणाने तारले

Patil_p

पावसाचा धडा

Patil_p

लसीकरणाची वाढती टक्केवारी आशादायी

Patil_p

कोकणातील रुग्णसंख्या चिंताजनक

Patil_p
error: Content is protected !!