तरुण भारत

शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा!

इरीकेशन फेडरेशनचा महावितरणला इशारा

कोल्हापूर / प्रतिनिधी

महापुरामध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्था व वैयक्तिक कृषिपंपधारक शेतकरी यांचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत मोटारी व इलेक्ट्रीक साहित्य यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. 2019 ला महाप्रलंयकारी महापुरात नुकसान झालेले साहित्यांचे सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱयांनी कर्जे काडून स्वखर्चाने दुरुस्ती केली होती. पुन्हा 2021 च्या महापुराने साहित्यांचे अपरिमीत नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून आता वीजबिलासाठी पुरवठा खंडीत करु नका, कारवाई केलात तर याद राखा असा खणखणीत इशारा इरिगेशन फेडरेनच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणला सोमवारी दिला. याबाबतचे निवेदन मुख्य अभियंता परेश भागवत यांना दिले आहे.

महावितरणने कोळशाची कमतरता व वीज निर्मीतीमधीत तुटवडा याचे कारण पुढे करत फक्त कृषिपंपाच्या वीज पुरवठ्यामध्ये कपात केली आहे. कृषिपंपाना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीज पुरवठा या आधी चालू होता. यामध्ये महावितरण कंपनीने रात्रीचे 2 तास कमी करुन रात्रीही 8 तास वीज पुरवठा केला आहे. शेतकरी सध्या फार मोठ्या आर्थिक आडचणीतून जात आहे. या पध्दतीने वीज पुरवठा झाल्यास त्याचा परिणाम शेतीपिकावर होऊन उभी पिके वाळून जाणार आहेत.त्यामुळे महावितरण कंपनीने पुर्वीप्रमाणे दिवसा 8 तास व रात्री 10 तास अखंडीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करावा. अशी मागणी केली आहे.

यावेळी वीजतज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किणीकर, सुभाष शहापूरे,चंद्रकात पाटील-पाडळीकर, सखाराम पाटील,एस. ए. कुलकर्णी,दत्तात्रय उगले, आर के पाटील, रणजीत जाधव,ज्ञानदेव पाटील, सखाराम पाटील, सखाराम चव्हाण, भारत पाटील-भुयेकर, जावेद मोमीन, महादेव सुतार व सचिव मारुती पाटील हे उपस्थित

Advertisements

Related Stories

संकेतस्थळातून जुळणार दिव्यांगांच्या रेशिमगाठी

Abhijeet Shinde

तीस वर्षांपूर्वीची रहिवासी अतिक्रमणे कायम करणार

Abhijeet Shinde

नोंदीपेक्षा कमी लोकांना धान्य देणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा

Abhijeet Shinde

कोरोनाः कर्नाटकात बुधवारी ८,६४२ बाधित

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वन्यप्राण्यांच्या हल्यात १० बकरी ठार तर दोन बेपत्ता

Abhijeet Shinde

भादोले येथे बैलाच्या वाढदिवसाला चारशे लोकांना जेवण – मा.खा. राजु शेट्टी यांची उपस्थिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!