तरुण भारत

दहशतीचे नवे नाव : ओमिक्रॉन

नेमके मुंबई महानगर प्रदेशातील केपटाऊनहून परतलेला डोंबिवलीकर कोविड पॉझिटिव्ह निघाला. कोविड पॉझिटिव्ह म्हणजे त्याला ओमिक्रॉन या म्युंटंटचा संसर्ग झाला असे होत नाही. ते जिनॉम सिक्वेसिंग तपासण्यांवर ठरणे बाकी आहे.  पण तो केपटाऊनहून परतला आहे, यावरुन चिंता पसरली. तसे पाहिल्यास पंधरा दिवसात एक हजारहून अधिक लोक दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांची ओळख करणे हेच आव्हान आहे.

गेल्या अठरा महिन्याच्या कोरोना कालावधीत अजूनही मुंबईकर म्हणून आपण काहीच शिकलो नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल qिडस्टसिंगला फाटा तर दिलाच. पण ज्या देशात ओमिक्रॉन विषाणू दहशत माजवत आहे, अशा देशातून मुंबई विमानतळावर परतताना संशयित देशातून आलो असल्याची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे समोर येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन म्हणजे बी.1.1.529 विषाणू जीवघेणा घातकी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केले. त्यानंतर जगातील इतर देशांना दक्षता घेण्याबाबतचे संदेश पाठविण्यात आले. त्यातून आपल्या देशातही नव्या विषाणूच्या अनुषंगाने नवी नियमावली जाहीर करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेत तर केंद्रांच्या नियमांसह स्थानिक पातळीवर नियम तयार करण्यात आले आहेत. यात मास्क वापरण्याची सक्ती, प्रवासाला लागणारे प्रमाणपत्र, रेल्वे प्रवासासह आता बसमध्येदेखील दुहेरी लसीकरणाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्याच्या विचारात असल्याचे समजत आहे. रुग्णालये, कोविड सेंटर, विशेष कोविड उपचार केंद्रांमधील उपचारांची तजवीज तपासण्यात आली असून तत्पर ठेवण्यात आली आहे. दुसरी लाट संपताना आणि तिसऱया लाटेच्या प्रतीक्षेत असताना या नव्या ओमिक्रॉन विषाणूने दहशत पसरवली. यातही रविवारची रात्र मुंबईकरांना अधिक परिक्षेची ठरली. मुंबई महानगरपालिकेच्या शेजारील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात केपटाऊनहून परतलेल्या प्रवाशाचे वृत्त रातोरात सगळीकडे पसरले. नेमका हा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून त्याचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात
ओमिक्रॉनच्या जिनॉम सिक्वेसिंग तपासणीसाठी त्वरीत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात परदेशातून आलेल्या 466 जणांची तपासणी करण्यात आली. या 466 मधील 97 जण मुंबईकर आहेत. या सर्वांना पालिकेकडून संपर्क करण्यात आला. तसेच पालिकेने सावध पवित्रा घेत यांच्या आतापर्यंत तीन कोरोना तपासण्या केल्या. यातील कल्याण डोंबिवलीमधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी रात्री निदान करण्यात आले. त्यामुळे या व्यक्तीचे नमुने कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ओमिक्रॉनच्या जिनॉम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आले. उर्वरित प्रवाशांचे नमुने गोळा करण्यात येणार असून यासाठी वेळ लागणार आहे. काल परवा घोषित झालेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या जिनॉम सिक्वेसिंग तपासणीस त्या क्षमतेचे किट उपलब्ध आहेत का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र मायक्रोबायोलॉजिस्ट तज्ञांच्या मते तेवढी क्षमता असून ती सखोल करण्यावर भर देण्याचे ते सुचवितात. ओमिक्रॉन व्हेरियंट गंभीर स्वरुपाचे परिणाम करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहेत.

Advertisements

गेल्या पंधरा दिवसात परदेशातून मुंबईत उतरणाऱया प्रवाशांची ओळख करण्यास यंत्रणा सज्ज झाली असली तरीही प्रवाशानेदेखील महामारीच्या नियमानुसार स्वतःहून ही तत्परता दाखवलेली दिसून येत नाही. जसे गेल्या पंधरा दिवसात हजार जण परदेशातून आले असल्याचे सांगण्यात आले असले तरी यातील काहीशे जणांनी संपर्काला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांची कोविड तपासणी आणि क्वारंटाईनचे नियम सांगण्यात आले. मात्र परदेशातून मुंबईत अन्य मार्गाने येणारे देखील परदेशी भारतीय असू शकतात. यांच्या तपासण्या किंवा माहिती कोणत्या मार्गाने मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या आणि दुसऱया कोरोना लाटे दरम्यान परदेशातून येणाऱया बऱयाच जणांनी खोटे पत्ते आणि मोबाईल नंबर दिलेले अनुभव विमानतळावरील कोरोना तपासणी कर्तव्यावर असलेले तत्कालीन डॉक्टरही सांगतात. त्यामुळे परदेशातून येणाऱया परदेशी प्रवाशाने सामाजिक बांधिलकीतून आपली माहिती देणे आवश्यक आहे. त्यातूनच स्थानिक पालिका यंत्रणा पुढील कार्यवाही करू शकते. आधीच्या कोरोना लाटेदरम्यान झालेल्या माहिती लपविण्याच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास ओमिक्रॉन संसर्ग शक्यतेचे रुग्ण शोधणे म्हणजे आव्हान ठरु नये.

डेल्टा व्हेरियंटची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवडय़ात घेतली असल्याचे कोरोना टास्क फोर्समधील तज्ञ सांगतात. डेल्टाचे तीन म्युटेशन होते. मात्र ओमिक्रॉनचे अशा प्रकारचे पन्नासहून अधिक म्युटेशन असण्याची शक्यता हे तज्ञ व्यक्त करत आहेत. म्हणून या ओमिक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान या व्हेरियंटला सामोरे जाण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. कारण व्हेरियंटभोवती तयार करण्यात झालेले प्रोटिनचे आवरण लसीकरणातून भेदण्यास मदत होईल. यातून कमी त्रास होऊ शकतो असे मायक्रोबायोलॉजिस्ट सांगत आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच सांगण्यात आलेली कोरोना अनुरुप वर्तुणूक म्हणजे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल qिडस्टंसिंग पाळण्याची गरज आहे. मुंबईत 100 टक्के पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले असून दुसरी मात्रा देणे सुरु आहे. बदलत्या घातकी व्हेरियंटमुळे लसीकरणाचे महत्व वाढले असूनही कित्येक जाण लसीकरणास अजूनही प्राधान्य देत नसल्याने नव्या व्हेरियंटचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा तज्ञ देत आहेत.

26 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने या घातकी विषाणूला नवे म्हणजे ओमिक्रॉन असे नाव देऊन तो कसा घातकी आहे याचे जगाला स्पष्ट सांगितले. दक्षिण आफ्रिकेसह नऊ देशात या विषाणूने उच्छाद मांडला आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असून प्रवाशांच्या तपासणीची जबाबदारी पालिकेने आधीच घेतली आहे. मात्र परदेशी प्रवाशाच्या इतिहासाची आणि स्वतःच्या आरोग्याची माहिती कुठेही न लपविता प्रस्तुत करणे ही क्षणाला सामाजिक बांधिलकीतून सर्वात मोठी मदत परदेशी प्रवाशांकडून होणार आहे.

राम खांदारे

Related Stories

अमली पदार्थांचे नशाजाल आता ऑनलाईन मार्गाने

Patil_p

पाकिस्तानला एकदा धडा शिकवाच

Patil_p

लस फुकट मिळेल, लस विकत मिळेल

Patil_p

मराठा ओबीसीकरण

Patil_p

बिहारमधील निवडणुकीत चमत्कार होणार काय?

Patil_p

यदूने सारा जीवभाव अवधुताना अर्पण केला

Patil_p
error: Content is protected !!