तरुण भारत

कोल्हापूर मेडिकल व स्पोर्टस हब होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे

पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर / प्रतिनिधी

आगामी काळात कोल्हापूर शहर आणि जिह्यात विविध क्रीडा प्रकाराच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा व प्रशिक्षण सुरु होणार आहे. मेडिकल आणि स्पोर्टस् हब म्हणून कोल्हापूरात मोठे रोजगार निर्माण होऊ शकतात. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भविष्यातील काळाची गरज लक्षात घेऊन, कलात्मक वास्तु निमिर्ती सह आपले योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. फुलेवाडी रिंग रोड येथे रॉयल ड्रीमलँडच्या पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. .

मुंबई, पुण्यापासून ते कर्नाटक बेंगळूरसह पणजी-गोवा हे सर्वांना कोल्हापूर मध्यवर्ती ठिकाण आहे. लवकरच होणाऱ्या सहा पदरी महामार्गामुळे कोल्हापूर हे मोठे विकासाचे केंद्र होणार आहे. मुख्यतः वैद्यकीय आणि क्रिडा क्षेत्रासाठी मोठी क्षमता कोल्हापूरमध्येच असल्याने, यासाठी लागणारी स्थावर उभारणी बांधकाम व्यावसायिकांनी युद्धपातळीवर करावी. यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रांरभी सर्वांचे स्वागत आनंद माने यांनी केले.आपल्या स्वागतपर भाषणात फुलेवाडीच्या परिसराला नवी ओळख देणारा असा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. तर राजीव परीख यांनी निवासी आणि औद्योगिक असा मिश्र पध्दतीचा हा प्रकल्प असून, पायाभरणीप्रसंगीच काहीनी केलेले बुकिंग हा सुरज इस्टेटवरील वीस वर्षाच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून हा विश्वास सार्थ ठरवू असे उद्गार त्यांनी काढले.. चेतनभाई वसा यांनी यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी कोल्हापूर विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांचा, तिरंगी रंगाचा पुष्पहार घालून, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर , दादासाहेब लाड आणि आनंद माने यांनी सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक राहुल माने , रिना कांबळे तसेच सारंगधर देशमुख यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रकल्पात प्रांरभी आपली नोंदणी केलेले आरक्षण केलेले अरविंदभाई शहा , कविता पाटील, निखिल यादव , संजय आजगेकर , विठ्ठल हुंबे यांना स्मृतिचिन्ह व डायरी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रदीप भाई कापडिया यांच्यासह बांधकाम , क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. क्रियेटिव्हच्या सुजित चव्हाण यांच्या टीमने या सोहळयाचे नियोजन केले.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार कायम

Abhijeet Shinde

10 वी आणि 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Sumit Tambekar

कोल्हापुरात कोरोनाचा तांडव; आज उच्चांकी 53 बळी, 1553 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापुरातील हद्दपार गुंडाची यादी जाहीर करा

Abhijeet Shinde

ओबीसी राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Abhijeet Shinde

नांद्रे येथे वाळू माफिया व अधिकारी यांच्यात संगनमताने वाळू तस्करी सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!